'तिसरी लाट यायची नसेल तर...'; केंद्र सरकार म्हणतं...

'तिसरी लाट यायची नसेल तर...'; केंद्र सरकार म्हणतं...

नवी दिल्ली : देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने हाहाकार माजवला आहे. त्यातच गेल्या बुधवारी केंद्र सरकारने तिसऱ्या लाटेबाबत इशारा दिला होता. तिसरी लाट येणे अपरिहार्य असल्याचं केंद्राकडून सांगण्यात आलं होतं. सरकारचे कोरोनासंबंधीचे प्रमुख सल्लागार के. विजयन राघवन म्हणाले होते की, "देशात कोरोनाची तिसरी लाट नक्की येईल. पण ती कधी येणार हे सांगता येत नाही. त्यामुळे तिसऱ्या लाटेपासून आपण तयार राहायला हवं."

मात्र, त्यांनी आता या विधानाबाबतचं पुढील स्पष्टीकरण दिलं आहे. त्यांनी म्हटलंय की, जर आपण कडक उपाययोजना राबवल्या, तर तिसरी लाट सगळ्या ठिकाणीच येणार नाही अथवा कुठेच येणार नाही. स्थानिक पातळीवर, राज्यां-राज्यांमध्ये, जिल्ह्यांमध्ये, शहरांमध्ये सगळीकडेच किती चांगल्या पद्धतीने उपाययोजना राबवल्या जातात त्यावर, ही बाब अवलंबून आहे, असं प्रमुख सल्लागार के. विजयन यांनी आता म्हटलं आहे.

'तिसरी लाट यायची नसेल तर...'; केंद्र सरकार म्हणतं...
दुसरी जात नाही, तोच तिसऱ्या लाटेची भीती; केंद्र सरकार म्हणतं

देशात कोरोनाची दुसरी लाट आली असून ती घातक ठरली आहे. मोठ्या प्रमाणात लोकांना कोरोनाची बाधा होत असून हजारो लोकांचा मृत्यू होत आहे. देशात सध्या 4 लाखांपेक्षा अधिक कोरोनाबाधित रुग्ण आढळून येत आहेत. 1 मे रोजी 401,993 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली होती. दररोज 3 हजारांपेक्षा अधिक रुग्णांचा मृत्यू होत आहे.

दुसऱ्या लाटेचा कहर सध्या सुरु असताना आता तिसऱ्या लाटेची चिंता सतावू लागली आहे. नव्या व्हॅरिएन्टबाबत बोलताना राघवन म्हणाले होते की, ''नवा स्ट्रेन जास्त प्रमाणात लोकांना बाधित करु शकतो. लस सध्याच्या स्ट्रेनवर प्रभावी आहे. पण, नवा व्हॅरिएन्ट भारतासह देशभरात पसरत आहे. देशात तिसरी लाट येणं निश्चित आहे. पण, ती कधी येईल हे सांगता येत नाही. पण, आपण तिसऱ्या लाटेसाठी तयार राहायला हवं."

'तिसरी लाट यायची नसेल तर...'; केंद्र सरकार म्हणतं...
छोटा राजन जीवंत आहे; एम्सचे स्पष्टीकरण

देशातील कोरोनाच्या लाटा

- पहिली लाट( COVID-19 Wave ) : मागच्या वर्षी मार्च - एप्रिल महिन्यात आली होती. १७ सप्टेंबर २०२० ला ९७ हजार ८६० इतके सर्वाधिक रुग्ण देशात आणले होते. दोन महिन्यांनी ही लाट ओसरून ४६ हजारांवर दैनंदिन रुग्णसंख्या आली होती.

- दुसरी लाट( COVID-19 Wave ) : मार्च महिन्याच्या सुरुवातीला. एक मार्चला देशात १२,२७० नवे रुग्ण आढळले होते. १ एप्रिलला ही संख्या ७५ हजारांवर गेली. महिना संपता संपता ३० एप्रिलला दैनंदिन रुग्ण संख्या ४.०२ लाखांवर आलीआहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com