कोव्हॅक्सिनच्या दुसऱ्या डोसला विलंब झाला, तर पहिला डोस वाया जातो? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कोव्हॅक्सिनच्या दुसऱ्या डोसला विलंब झाला, तर पहिला डोस वाया जातो?

कोव्हॅक्सिनच्या दुसऱ्या डोसला विलंब झाला, तर पहिला डोस वाया जातो?

मुंबई: सध्या राज्यात कोव्हॅक्सिन (Covaxin) लसींचा मोठा तुटवडा निर्माण झाला आहे. केंद्राकडून राज्याला फक्त ३६ हजार कोव्हॅक्सिनचे डोस मिळाले आहेत. ज्या नागरिकांनी कोव्हॅक्सिनचा पहिला डोस घेतलाय, त्यांना दुसरा डोस (second dose) मिळत नाहीय. त्यामुळे नागरिकांची चिंता वाढत चालली आहे. त्यांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण होत आहेत. दुसरा डोस मिळाला नाही, तर परत कोरोना होईल का? अशी भीती अनेकांच्या मनात आहे. (If you are late to take second dose of Covaxin will it first shot ineffective)

कोव्हॅक्सिनची (Covaxin vaccine) लस मिळत नसल्याने, अनेकांच्या मनात चिंता आणि संतापाची भावना आहे. कोव्हॅक्सिनचा पहिला डोस (vaccine dose) घेतल्यानंतर ४ ते ६ आठड्यांनी दुसरा डोस दिला जातो. पण कोव्हिशिल्ड किंवा कोव्हॅक्सिनच्या दुसऱ्या डोसला विलंब झाला म्हणून पहिला डोस निष्प्रभावी ठरत नाही, असे तज्ज्ञांनी सांगितले. महाराष्ट्रात पाच लाख नागरिक कोरोनाच्या दुसऱ्या डोसच्या प्रतिक्षेत आहेत. (If you are late to take second dose of Covaxin will it first shot ineffective)

हेही वाचा: वांद्रयामध्ये बलात्कारानंतर गळा चिरुन महिलेची हत्या

"दुसऱ्या डोसला विलंब झाला, तर घाबरु नका" असे डॉ. एन.के.अरोरा यांनी सांगितले. "कोव्हॅक्सिनचा पहिला डोस घेणाऱ्या अनेकांनी अजून दुसरा डोस घेतलेला नाही. त्यांनी चिंता करण्याची गरज नाही. दोन डोसमधील अंतर आठ ते दहा आठवड्यांनी वाढलं, तरी चिंता करण्याची आवश्यकता नाही. दुसरा डोस घेतल्यानंतरही कोरोना विरोधात लस प्रभावीच ठरेल" असे डॉ. एन.के.अरोरा यांनी सांगितले.

पहिला डोस घेतल्यानंतरच रोगप्रतिकारक शक्ती निर्माण होते. पण दुसऱ्या डोसला विलंब झाला म्हणून तो प्रभाव निघून जात नाही, असे आयआयएसईआरचे इम्युनोलॉजिस्ट डॉ. विनीता बाल म्हणाल्या. दुसरा डोस बुस्टर आहे. त्यामुळे पहिल्या डोसमुळे निर्माण झालेली क्षमता आणखी वाढते, असे विनीता म्हणाल्या. ज्येष्ठ नागरिकांनी गर्दीच्यावेळी लसीकरण केंद्रावर जाणे टाळावे, तिथे संसर्गाची बाधा होण्याचा धोका असतो, असे डॉ. विनीता म्हणाल्या.

Web Title: If You Are Late To Take Second Dose Of Covaxin Will It First Shot

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :vaccination
go to top