वांद्रयामध्ये बलात्कारानंतर गळा चिरुन महिलेची हत्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Rahuri Datir murder

वांद्रयामध्ये बलात्कारानंतर गळा चिरुन महिलेची हत्या

मुंबई: वांद्रे-कुर्ला कॉम्पलेक्स (bandra kurla complex) येथे MTNL जंक्शनजवळ मंगळवारी एका महिलेचा गळा चिरलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळला. सर्वप्रथम परिसरातील स्थानिकांनी हा मृतदेह पाहिला. त्यांनी लगेच नजीकच्या नियंत्रण कक्षात फोन करुन पोलिसांना याची माहिती दिली. हत्या करण्याआधी महिलेवर बलात्कार (women rape) झाल्याचं बीकेसी पोलिसांच्या तपासातून समोर आलय. (Raped her throat slit womans body found in Mumbai)

प्राथमिक वैद्यकीय अहवालानुसार, महिलेचा गळा चिरण्यात आला असून तिच्या गुप्तांगावर जखमा आहेत. हत्या आणि बलात्कारांच्या कलमांखाली अज्ज्ञात आरोपींविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

हेही वाचा: आजोबांचं क्वारंटाइन संपलं; नातेवाईक आणायला गेले अन् बसला धक्का

मृत महिला शरीरविक्रीय करणारी असू शकते तसेच पैशाच्या वादातून महिलेची हत्या झाल्याचा अंदाज बीकेसी पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्याने व्यक्त केला. आरोपीला शोधून काढण्यासाठी पोलिसांनी संपूर्ण परिसराचे सीसीटीव्ही फुटेज मागितले आहे. आरोपीला शोधून काढण्यासाठी पोलिसांनी टीम बनवली आहे.

Web Title: Raped Her Throat Slit Womans Body Found In

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :crime
go to top