बनावट फोटो बनवत असाल तर...

वृत्तसंस्था
बुधवार, 19 जून 2019

सोशल मीडियात व्हायरल होणारी एडिट केलेली छायाचित्रे व व्हिडिओ याबद्दल चिंता व्यक्त होत असतानात याला पायबंद घालण्यासाठी 'ऍडॉब' या सॉफ्टवेअर क्षेत्रातील कंपनीने एक खास यंत्र तयार केले आहे. याद्वारे एडिट केलेले छायाचित्र ओळखणे शक्‍य होणार आहे.

नवी दिल्ली : सोशल मीडियात व्हायरल होणारी एडिट केलेली छायाचित्रे व व्हिडिओ याबद्दल चिंता व्यक्त होत असतानात याला पायबंद घालण्यासाठी 'ऍडॉब' या सॉफ्टवेअर क्षेत्रातील कंपनीने एक खास यंत्र तयार केले आहे. याद्वारे एडिट केलेले छायाचित्र ओळखणे शक्‍य होणार आहे.

'ऍडॉब' आणि 'यूसी बर्कले' या कंपन्यांच्या संशोधकांनी हे यंत्र विकसित केले असून, यासाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर केला आहे. या यंत्रामुळे एडिट केलेल्या छायाचित्रामध्ये काय काय बदल केले आहेत याची माहिती मिळणार असल्याने बनावट छायाचित्र ओळखणे सोपे होईल, असा दावा कंपनीने केला आहे. मूळ छायाचित्रांमध्ये बदल केलेल्या हजारो छायाचित्रांवर याची चाचणी घेण्यात आली आहे. अनेक प्रयोगांमधून एडिट केलेली छायाचित्रे या यंत्राने ओळखली आहे. सामान्य डोळ्यांनी पाहिल्यास एडिट केलेले छायाचित्र ओळखण्याचे प्रमाण 53 टक्के आहे, तर यंत्राच्या मदतीने 99 टक्के वेळा छायाचित्रांमधील बदल ओळखण्यात आला, असे सांगण्यात आले. 

भविष्यात अधिक संशोधन 
'ऍडॉब फोटोशॉप'च्या 'फेस अवेअर लिक्विफाय' हे तंत्रज्ञान वापरून तयार केलेल्या छायाचित्रांमध्ये केलेले बदलच या यंत्राने ओळखता येणार आहेत. हे केवळ प्रारूप आहे. मात्र यात अजून संशोधन करून बनावट छायाचित्रांद्वारे होणाऱ्या गैरवापरास प्रतिबंध घालण्यासाठी त्यातील बदल ओळखण्यासाठी यंत्रणा उपलब्ध करण्याची योजना असल्याचे कंपनीने सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: If you are making fake photos