esakal | बलवान असाल तर चीनला पळवून लावा : मेहबुबा मुफ्ती
sakal

बोलून बातमी शोधा

mehbooba-mufti

‘तुम्ही एवढे बलवान आहात तर जा आणि चीनला पळवून लावा. चीनचे नाव घेतात त्यांचे हातपाय कापायला लागतात. ते येथे ताकद का दाखवीत आहेत,’’ अशी जहाल टीका पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टी (पीडीपी)च्या अध्यक्षा मेहबुबा मुफ्ती यांनी केंद्र सरकावर केली.

बलवान असाल तर चीनला पळवून लावा : मेहबुबा मुफ्ती

sakal_logo
By
सकाळन्यूजनेटवर्क

श्रीनगर - ‘तुम्ही एवढे बलवान आहात तर जा आणि चीनला पळवून लावा. चीनचे नाव घेतात त्यांचे हातपाय कापायला लागतात. ते येथे ताकद का दाखवीत आहेत,’’ अशी जहाल टीका पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टी (पीडीपी)च्या अध्यक्षा मेहबुबा मुफ्ती यांनी केंद्र सरकावर केली.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

केंद्राने लागू केलेल्या नवीन जमीन कायद्याविरोधात पीडीपीने आज मोर्चा काढण्याचा प्रयत्न प्रशासनाने फोल ठरवीत काश्‍मीर विधान परिषदेचे माजी आमदार खुर्शिद आलम यांच्यासह अनेक नेत्यांना ताब्यात घेतले. ‘पीडापी’चे च्या मुख्यालयापासून आज मोर्चा काढण्यात येणार होता. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

त्यासाठी नेते तेथे पोचताच पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. त्यावर नाराजी व्यक्त करीत मुफ्ती यांनी एका ट्विटमध्ये श्रीनगरमधील पक्षाच्या कार्यालयाला प्रशासनाने सील ठोकले असून शांततेत मोर्चा आयोजित केल्याप्रकरणी नेते व कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले असा दावा केला. मोर्चाला परवानगी न दिल्याबद्दल त्या म्हणाल्या की, येथील माणसांना ते का बोलू देत नाहीत? त्यांचा हेतू जातीयवादी आहे. उद्योजकांनी काश्‍मीरमध्ये जमीन खरेदी करावी, असा प्रयत्न भारत सरकार करीत आहे. 

भाजपला लडाख, जम्मूच्या जनतेशी काहीही देणेघेणे नाही. उद्योगपतींसाठी जमिनी हिसकावून घेणे एवढाच त्यांचा हेतू असल्याचे  जम्मूवासीयांना कळले आहे.
- मेहबुबा मुफ्ती, अध्यक्षा पीडीपी

Edited By - Prashant Patil

loading image