Sail Bite : सणासुदीच्या काळात पाल चावली तर काय कराल? पाल चावणं जीवावर बेतू शकतं का? जाणून घ्या..

भारतात आढळणाऱ्या सगळ्या पाली आणि सरडे हे बिनविषारी असतात
Sail Bite
Sail Bite esakal

Sail Bite : सध्या आपल्या महाराष्ट्रात सणासुदीचा काळ आहे. त्यामुळे आपल्या घराची साफसफाई करणं लोकांचा तसा आवडता कार्यक्रम म्हणावा लागेल. पण कधीकधी अशी कामं करताना लोकांवर वाईट वेळ ओढवते. जसं की पाल चावणं किंवा आणखीन बरंच काही.

आता पाल चावल्याने इन्फेक्शन होऊ शकते. पण ते जीवावर बेतू शकते का?

तर पाली आणि सरडे या बाबतीतला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे, भारतात आढळणाऱ्या सगळ्या पाली आणि सरडे हे बिनविषारी असतात. एखादी पाल किंवा सरडा चावल्याने कसल्याही प्रकारची विषबाधा व मृत्यू व्हायची शक्यता नसते. 'दुधात पाल पडल्याने माणसांना विषबाधा' अशा बातम्या आपण बरेचदा वाचत किंवा ऐकत असतो. दुधात कोणताही प्राणी मरून पडला असेल तर त्याने अपचन होऊन पोट बिघडू शकते. तो कोणता प्राणी आहे याच्याशी त्याचा काहीही संबंध नसतो.

Sail Bite
Health Tips : झटपट Weight Loss करायचाय? मग मखानाच्या या हेल्दी आणि टेस्टी रेसिपी नक्की ट्राय करा

त्याचप्रमाणे ‘पाल चुकचुकली’ हा शब्दप्रयोग काही तरी अशुभ घडेल या अर्थाने वापरला जातो. पण तुमच्या घरात पालीचा आवाज येतो आहे, म्हणजे तुमच्या घरात माश्या, झुरळे आणि डास यांचे वास्तव्य मोठय़ा प्रमाणावर असावे आणि त्यांना खाण्यासाठी पाली तुमच्या घरात येत असाव्यात. याचा अर्थ पाली एक प्रकारे तुमच्या घरातील या कीटकांवर नियंत्रणच ठेवत असतात. आपल्या घरात आढळणाऱ्या पालींना ‘हाऊस गेको’ असे म्हटले जाते. दक्षिणेकडची आणि उत्तरेकडची अशा पालींच्या दोन जाती आपल्या घरांमध्ये आढळून येतात.

Sail Bite
Pregnancy Diet Tips : गरोदर मातांनी हे सहा पदार्थ नक्कीच खावेत; बाळ होईल श्री कृष्णासारखंच गुटगुटीत!

पाल चावल्यानंतर काय कराल?

तर तो भाग तात्काळ गरम पाण्यात बुडवा. किमान 20 मिनिटं गरम पाण्यात तो भाग राहिल्याने इंफेक्शन पसरण्याचा धोका कमी होतो.

अ‍ॅन्टिबायोटिक क्रीम

पाल चावल्यानंतर त्या भागावर कापसाच्या बोळ्यावर अ‍ॅन्टिसेप्टिक लोशन लावून स्वच्छ करा. त्यानंतर अ‍ॅन्टिबायोटिक क्रीम लावा.

Sail Bite
Eye Care Tips : डोळ्यांना दिसायचंच बंद झालंय? ही फळ परत करतील तुमची नजर, आजच खायला सुरूवात करा

बर्फ लावा

पाल चावल्यानंतर त्याजागी सूज आल्यास तात्काळ बर्फाचा शेक द्यावा. थेट जखमेवर बर्फ लावू नका. जखमेच्या आसपासच्या भागावर बर्फ लावा.

हळद

हळदीमध्ये अ‍ॅन्टीबायोटिक गुणधर्म असल्याने कोणत्याही जखमेवर हळद फायदेशीर ठरते. तेलात हळद मिसळून लावल्याने रक्तात संसर्ग पसरण्याचा धोका कमी होतो.

Sail Bite
Workout Tips रिकाम्यापोटी वर्कआऊट करावे का? जाणून घ्या फायदे व तोटे

पालीचा दात काढा

पालीचे दात अत्यंत लहान असतात. चावल्यानंतर अनेकदा ते जखमेमध्येच राहू शकतात. तुम्हांला दात दिसल्यास तो तात्काळ काढून टाका.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com