Pregnancy Diet Tips : गरोदर मातांनी हे सहा पदार्थ नक्कीच खावेत; बाळ होईल श्री कृष्णासारखंच गुटगुटीत!

गर्भवती महिलांनी हे 6 पदार्थ जरूर खावेत
Pregnancy Diet Tips
Pregnancy Diet Tips esakal

Pregnancy Diet Tips : गर्भवती स्त्रियांच्या खाण्यापिण्याची विशेष काळजी घेतली जाते. तिला हवं नको ते पाहिलं जातं,तिचे आंबट गोड डोहाळे पुरवले जातात. या सगळ्याचा एकच उद्देश असतो तो म्हणजे बाळ आणि आई सुखरूप यातून पार पडावेत. बाळाचा बिज गर्भात रूजणं आणि तो सुखरूप जन्माला येणं हे खूप मोठं दिव्य आहे. त्यामुळेच या ९ महिन्यांच्या काळात आईची खास काळजी घेतली जाते.

गरोदरपणात स्त्रिया त्यांच्या खाण्याच्या सवयींबद्दल खूप सावध असतात, त्यांना असा आहार आवश्यक असतो ज्यामुळे गर्भातील बाळाचे योग्य पोषण होऊ शकेल. या काळात जास्त खाणे टाळा आणि पौष्टिकतेने युक्त अन्नाचे सेवन करत रहा. गरोदरपणात योग्य आहार घेतल्यास तुमच्या न जन्मलेल्या मुलाच्या आयुष्याची चांगली सुरुवात होऊ शकते.

गर्भधारणेदरम्यान, महिलांनी जीवनसत्त्वे, खनिजे, निरोगी चरबी, कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट्स, फायबर आणि द्रवपदार्थांचे सेवन करणे महत्वाचे आहे. बाळाची तब्बेत, हालचाल या गोष्टींची तपासणी वेळोवेळी करून डॉक्टर महिलांना डायट देत असतात. पण, तरीही काही असे पदार्थ आहेत जे तुमच्या बाळासाठी फायद्याचे ठरणार आहेत.

Pregnancy Diet Tips
Pregnancy Health Tips : गर्भधारणेदरम्यान डेंग्यूंची लागण ठरू शकते घातक; जाणून घ्या लक्षणं आणि उपाय!

गर्भवती महिलांनी हे 6 पदार्थ जरूर खावेत

दुग्धजन्य पदार्थ

गर्भधारणे दरम्यान महिलांना अतिरिक्त प्रथिने आणि कॅल्शियमची आवश्यकता असते, अशा परिस्थितीत दूध आणि दही आपल्या यादीत असले पाहिजे. जेणेकरून त्यांना महत्त्वाचे पोषक घटक मिळू शकतील. रोज सकाळी आणि रात्री एक ग्लास दुधाचे सेवन केलं तर प्रसुतीनंतर होणाऱ्या वेदना थोड्याप्रमाणात कमी होऊ शकतात.

रताळे

रताळे हे आपल्याला पावसाळा अन् हिवाळ्यात मिळणारा पदार्थ. रताळे पोट भरलेलं ठेवण्यासाठी फायद्याचे आहेत. एक वेगळा अन् चविष्ट पदार्थ असल्याने त्याला मागणीही आहे. गर्भवती स्त्रियांनी रताळे खावेत. रताळे पोटातील बाळासाठीही फायदेशीर आहे. यातून व्हिटॅमिन-ए आणि फायबर मिळतात. ते बाळाच्या वजन वाढीसाठी फायद्याचे आहेत.

Pregnancy Diet Tips
Pregnancy diet: प्रेग्नेंसीमध्ये खाताय थंड थंड दही? जाणून घ्या यावर तज्ज्ञांचे मत काय आहे?

सॅल्मन फिश

जर तुम्हाला सी फूड आवडत असेल तर गरोदरपणात सॅल्मन फिश नक्की खा. कारण त्यात भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन डी आणि कॅल्शियम असते. जे हाडांच्या विकासासाठी आवश्यक असते. (Janmashtami 2023)

अंडी

अंडी हे अतिशय आरोग्यदायी अन्न मानले जाते. जे गर्भधारणेदरम्यान आवश्यक पोषक तत्त्वे प्रदान करते. ज्यामध्ये प्रथिने, चरबी, जीवनसत्त्वे आणि खनिजे असतात. त्यामुळे गर्भवती मातांनी अंड्याचे सेवन करावे.

Pregnancy Diet Tips
Pregnancy Tips : २० व्या आठवडे झालेत बाळाने किक मारायला सुरूवात केलीय का? जाणून घ्या किती होते बाळाची वाढ?

ड्राय फ्रूट्स

सुक्या मेव्यामध्ये कॅलरीज, फायबर, अनेक जीवनसत्त्वे आणि खनिजे आढळतात. यासोबतच अनेक ड्रायफ्रुट्समध्ये नैसर्गिक साखरही आढळते. प्रसुतीनंतर होणाऱ्या वेदना कमी होतात. शरीरात कॅल्शिअम निर्माण होते अन् प्रसुतीनंतरच्या अनेक आजारांची सुट्टी होते.

पाणीदार फळे, पदार्थ

गर्भधारणेदरम्यान, थोड्या थोड्या वेळाने द्रवपदार्थाचे सेवन करा. जेणेकरून तुम्हाला आणि तुमच्या बाळाला पाण्याची कमी भासणार नाही. पाण्याव्यतिरिक्त, आपण अधिक द्रव असलेली फळे खाऊ शकता. अनेकदा नारळ पाणी पिण्याचा सल्ला दिला जातो.तर, कलिंगड, टरबूज अशी फळंंही खावीत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com