Iffi | ‘इफ्फी’मुळे भारतीय चित्रपटांना जगात स्थान; अनुराग ठाकूर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Hemamalini
‘इफ्फी’मुळे भारतीय चित्रपटांना जगात स्थान; अनुराग ठाकूर

‘इफ्फी’मुळे भारतीय चित्रपटांना जगात स्थान; अनुराग ठाकूर

पणजी - गेल्या ५२ वर्षात ‘इफ्फी’ने जगभरात भारतीय चित्रपटाला स्थान मिळवून दिले आहे. देशातील कलाकारांना मान सन्मान आणि ओळख मिळवून दिली. या वर्षी आपण देशाच्या स्वातंत्र्याची ७५ वर्षे साजरी करत आहोत आणि शताब्दीकडे वाटचाल करताना आपण येत्या २५ वर्षांत जगभरात ‘इफ्फी’च्या माध्यमातून देशाचा सिनेध्वज उंच फडकावत ठेवू या, असा निश्चय केंद्रीय माहिती आणि प्रसारण आणि युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांनी आज व्यक्त केला. ताळगाव येथील शामाप्रसाद मुखर्जी स्टेडियममध्ये आयोजित ५२ व्या इफ्फीचे हेमामालिनी यांच्या हस्ते औपचारिक उद्घाटन झाल्यानंतर ते बोलत होते.

कार्यक्रमाला गोव्याचे राज्यपाल श्रीधरन पिल्ले, माहिती आणि प्रसारण मंत्रालय राज्यमंत्री डॉ एल मुरुगन, गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, इफ्फी महोत्सवाचे संचालक चैतन्य प्रसाद, केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते. भारताची कथा ही भारतीयांनी लिहिलेली आणि परिभाषित केली आहे. त्यामुळे देशातील सिनेनिर्मात्यांनी आपल्या देशातल्या या सहयोगी वैविध्‍यतेला आपल्या चित्रपटांच्या माध्यमातून सिनेमॅटिक कॅलिडोस्कोपचा एक भाग बनवावे, असे आवाहनदेखील यावेळी ठाकूर यांनी केले.

हेही वाचा: राजस्थानमध्ये राजकीय भूकंप! गेहलोत मंत्रिमंडळातील सर्व मंत्र्यांचे राजीनामे

गोव्यात व्हावी फिल्मसिटी

गेल्या १७ वर्षांपासून इफ्फीचे आयोजन करणाऱ्या गोव्याचा लौकिक आज जगभरात पोहोचला आहे. देशविदेशातून याठिकाणी चित्रीकरणासाठी कलाकार येतात. मनोरंजनाच्या माध्यमातही आता गोवा स्वंयपूर्ण होत आहे. गोव्यात चित्रपट संस्कृती अधिक रुजण्यासाठी केंद्र सरकारने पुढाकार घ्यावा आणि राज्यामध्ये सरकारच्या वतीने किंवा जनता आणि सरकारच्या सहकार्यातून (पीपीपी) अद्ययावत फिल्मसिटी उभारण्यास पुढे यावे, अशी मागणी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केली.

हेमामालिनी यांना पुरस्कार प्रदान

या सोहळ्यात अभिनेत्री हेमा मालिनी यांना भारतीय चित्रपट व्यक्तिमत्त्व-२०२१, हा पुरस्कार अनुराग ठाकूर, प्रमोद सावंत यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. गीतकार आणि सेन्सॉर बोर्डाचे अध्यक्ष प्रसून जोशी हे या पुरस्काराचे दुसरे मानकरी असून त्यांना इफ्फीच्या समारोपाच्या दिवशी सन्मानित करण्यात येणार आहे.

loading image
go to top