CAA Protest : IIM च्या विद्यार्थ्यांचे अनोखे आंदोलन; फोटो व्हायरल

वृत्तसंस्था
रविवार, 22 डिसेंबर 2019

आयआयएमच्या विद्यार्थ्यांनी या कायद्याला विरोध करत मुख्य दरवाजाच्या बाहेर आपल्या चपला व बूट काढून ठेवले आहेत. एका प्राधापकानेही विद्यार्थ्यांच्या या आंदोलनाला पाठींबा देत आपल्या चपला विद्यार्थ्यांसोबत ठेवल्या आहेत.

बंगळूर : नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात (सीएए) देशभरात आंदोलन होत असताना बंगळूरमधील आयआयएमच्या विद्यार्थ्यांनी अनोखे आंदोलन करत सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे. या आंदोलनाचे फोटो सोशल मीडियात व्हायरल झाले आहेत.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

राजकीय, साहित्य, बॉलिवूड, विद्यार्थ्यांकडून केंद्र सरकारविरोधात आंदोलन करण्यात येत आहे. अऩेक ठिकाणी हिंसक घटना घडल्या आहेत. या आंदोलनात आतापर्यंत देशभरात 10 हून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. एकीकडे हिंसक आंदोलने होत असताना बंगळूरमधील आयआयएमच्या विद्यार्थ्यांनी या कायद्याला विरोध करण्यासाठी वेगळाच मार्ग पत्करला आहे.

...म्हणून प्रज्ञासिंह ठाकूर यांची स्पाईसजेटविरोधात तक्रार

आयआयएमच्या विद्यार्थ्यांनी या कायद्याला विरोध करत मुख्य दरवाजाच्या बाहेर आपल्या चपला व बूट काढून ठेवले आहेत. एका प्राधापकानेही विद्यार्थ्यांच्या या आंदोलनाला पाठींबा देत आपल्या चपला विद्यार्थ्यांसोबत ठेवल्या आहेत. बंगळूरमध्ये जमावबंदीचे कलम 144 लागू असल्याने एकत्र न जाता चपला तेथे ठेवण्यासाठी प्रत्येकजण आपला नंबर येईपर्यंत वाट पाहताना दिसले. काही विद्यार्थ्यांनी त्याठिकाणी फूल पण ठेवले आहे. शांततेचा संदेश देण्यासाठी आम्ही हे आंदोलन केल्याचे विद्यार्थ्याने सांगितले. आयआयएमबाहेर पोलिस बंदोबस्त असला तरी विद्यार्थ्यांच्या या आंदोलनाला पोलिसांनीही विरोध केलेला नाही.

सरकारकडून धार्मिक व सामाजिक ऐक्यास धोका : शरद पवार

प्राध्यापक दीपक यांनी सांगितले, की सीएए आणि एनआरसी हे कायदे आपली ओळख बदलत आहेत. आम्ही शैक्षणिक दृष्टीकोन याकडे पाहतो. विद्यार्थ्यांनी सामाजिक मुद्द्यांवर बोलण्यासाठी ही चांगली वेळ आहे. विद्यापीठांनी कोणत्याही बाजूला झुकते माप देवू नये. तसेच या कायद्याविरोधात आंदोलन करण्याची परवानगी दिली पाहिजे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: IIM Bangalore students unique protest against Citizenship Amendment act