esakal | सरकारकडून धार्मिक, सामाजिक ऐक्यास धोका : शरद पवार

बोलून बातमी शोधा

NCP Chief Sharad Pawar speaks abour CAA and NRC

सरकारकडून धार्मिक व सामाजिक ऐक्यास धोका पोचविण्यात येत आहे. सरकारने कायदा आणून मुद्दाम अस्थिरता निर्माण केली आहे, अशी जोरदार टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली आहे.

सरकारकडून धार्मिक, सामाजिक ऐक्यास धोका : शरद पवार
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : देशाची अर्थव्यवस्था खिळखिळी झाली असताना लक्ष दुसरीकडे केंद्रीत करण्यात आले आहे. आठ राज्यांनी या कायद्याची अंमलबजावणी करणार नाही, असे म्हटले आहे. बिहारचे मुख्यमंत्री एनडीएचे प्रतिनिधी असूनही त्यांनी एनआरसीला विरोध केला आहे. रामविलास पासवान यांचीही नागरिकत्व कायद्याला विरोध आहे. सरकारकडून धार्मिक व सामाजिक ऐक्यास धोका पोचविण्यात येत आहे. सरकारने कायदा आणून मुद्दाम अस्थिरता निर्माण केली आहे, अशी जोरदार टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली आहे.

राष्ट्रवादी आणि काँग्रेसबद्दल काही बोलायलाच नको : राज ठाकरे

केंद्र सरकारने देशभर लागू केलेल्या सीएए आणि एनआरसी कायद्याविरोधात देशभर हिंसक आंदोलन करण्यात येत आहे. अनेक ठिकाणी काही नागरिकांना जीव गमवावा लागला आहे. याच मुद्द्यावरून शरद पवार यांनी आज (शनिवार) पत्रकार परिषद घेत सरकारवर टीका केली. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

शरद पवार म्हणाले, ''राष्ट्रवादी काँग्रेसने नागरिकत्व कायद्याला संसदेला विरोध केला. लोकांच्या तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. देशातील सामाजिक ऐक्यावर गदा येण्याची शक्यता आहे. तीन देशांतील एनआरआय नागरिकांना नागरिकत्व देण्याची ही खेळी आहे. देशातील मुळ समस्यांपासून लक्ष हटविण्याची ही खेळी आहे. विशिष्ट धर्मांतील नागरिकांवर लक्ष केंद्रीत करून गरिबांवर परिणाम होत आहेत. श्रीलंकेतील तामिळ नागरिकांचा विचार का केला नाही. आसाममधील लाखो नागरिक नाराज आहे. पुण्यात अनेक नेपाळी नागरिक आहेत, त्यांचे काय? 30 वर्षांपासून ते पुण्यात स्थायिक आहेत. महाराष्ट्रातही याचे परिणाम दिसत आहेत. केंद्र आणि राज्यात जाणीवपूर्वक अंतर निर्माण केले जात आहे.''

अमित शहा तुमचे अभिनंदन, तुम्ही यशस्वी ठरला : राज ठाकरे