Trekking Missing Case : ‘ट्रेकिंगला जातोय’ म्हणून होणाऱ्या पत्नीला मेसेज; IIT इंजिनिअर ५ दिवसांपासून बेपत्ता, लॅपटॉपच्या सर्च हिस्ट्रीने पोलिसांची झोप उडाली

IIT Engineer Mystery : ‘ट्रेकिंगला जातोय’ असा मेसेज होणाऱ्या पत्नीला केल्यानंतर IIT इंजिनिअर बेपत्ता झाला. पाच दिवसांपासून शोध सुरू असून लॅपटॉपच्या सर्च हिस्ट्रीतून पोलिसांना धक्कादायक माहिती मिळाली.
Trekking Missing Case IIT Engineer Mystery

Trekking Missing Case IIT Engineer Mystery

esakal

Updated on

Laptop Search History : बंगळुरूच्या ग्रामीण भागातील डोब्बसपेटजवळील शिवगंगेच्या डोंगरावर एकट्याने ट्रेकिंगसाठी गेलेला ३१ वर्षीय तरुण बेपत्ता झाला आहे. शुक्रवारी सकाळी तो ट्रेकसाठी घरातून निघाला होता. त्यानंतर त्याचा ठावठिकाणा लागलेला नाही. अद्वैत उपाध्याय असे बेपत्ता तरुणाचे नाव आहे. तो पूर्व बंगळुरूतील कडुगोडी परिसरात राहतो. तो इंदूरमधील एका व्यावसायिकाचा मुलगा आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com