IIT
IITsakal

IIT मध्ये इंजिनियरिंग सोबत आता संस्कृत, योग, गणित हेही शिकणार विद्यार्थी; पूर्ण अभ्यासक्रमच बदलणार...

काय आहे नवीन भारतीय ज्ञान प्रणाली, ज्याच्या माध्यमातून आयआयटीमध्ये भारतीय संस्कृती आणि परंपरा यांचं ज्ञान मिळणार आहे.
Published on

इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजी, अर्थात आय आयटी कानपूरमध्ये आता इंजिनियरिंग सोबतच भारतीय गणित, मनोविज्ञान, भारतीय रसायन विज्ञान, पदार्थ विज्ञान, धातू विज्ञान, भारतीय वास्तुकला आणि वास्तू शास्त्र, प्राचीन भारतीय खगोल विज्ञान, पशु आयुर्वेद, योग अशा भारतीय परंपरेतले विषय शिकवले जाणार आहेत. आयआयटी कानपूरने नुकतंच भारतीय ज्ञान प्रणाली म्हणजेच Indian Knowledge System (IKS) साठी SIKSA रिसर्च सेंटरचं उद्घाटन केलं आहे.

IIT
Trending News: जगातला एक अजब परिवार; प्राण्याप्रमाणे चार पायांवर चालतात माणसं; काय आहे इथलं रहस्य?

आयआयटी कानपूरचे संचालक अभय करंदीकर यांनी या सेंटरबद्दल माहिती दिली आहे. आजतकशी बोलताना ते म्हणाले, सर्वांगीण प्रगतीसाठी भारतीय ज्ञान प्रणालीच्या SIKSA या अध्ययन केंद्राच्या माध्यमातून आमचं ध्येय आहे की भारतातल्या विशाल ज्ञान प्रणालीला आपल्या शैक्षणिक अभ्यासक्रमाचा भाग बनवणे.

तसंच संशोधनाच्या माध्यमातून हे ज्ञान एकत्रित करून ते जगापर्यंत पोहोचवण्याचं आमचं उद्दिष्ट आहे. हे केंद्र संशोधन आणि विकासासाठी एक मंच प्रदान करेल आणि आम्हाला आशा आहे की आम्ही आयआयटी कानपूरला जागतिक स्तरावर IKS अध्ययनासाठीच्या एका प्रमुख संस्थेच्या रुपात उभारू शकू.

SIKSA केंद्राचा उद्देश

१२ पेक्षा अधिक विभाग आणि जवळपास २० शिक्षक या केंद्रामध्ये काम करत आहेत. आपल्या भाषणात करंदीकर यांनी सांगितलं की, या केंद्राच्या माध्यमातून आरोग्य कल्याण, गणित, खगोल विज्ञान, संस्कृत आणि इतर भाषांचा अभ्यास, पुरातत्व धातू विज्ञान, संगीत यासह अनेक भारतीय संकल्पनांच्या अभ्यासासह या क्षेत्रांमध्ये संशोधन करेल.

IIT
Trending News: ७८ वर्षांचे आजोबा पुन्हा बसले वर्गात; रोज तीन किलोमीटर चालत जातात शाळेला

भारतीय ज्ञान प्रणाली म्हणजे काय?

भारतीय ज्ञान प्रणालीमध्ये गणित, विज्ञान, चिकित्सा, खगोल विज्ञान, वास्तूकला, कला, भाषा, साहित्य, सांस्कृतिक आणि सामाजिक प्रथा परंपरा अशा क्षेत्रांमध्ये भारतात विकसित झालेल्या ज्ञानाचा समावेश आहे. या प्रणालीमध्ये ज्ञान स्विकारणं, त्याचा प्रचार प्रसार करणं, यासाठी स्वतःचे काही नियम, मापदंड आहेत.

भारत सरकारने भारतीय ज्ञान प्रणालीतल्या विविध विषयांवर आधारित व्हिडीओ आणि इतर साहित्य तयार करण्यासाठी आय आय टी कानपूर, आयआयटी मुंबई, आयआयटी बीएचयू वाराणसी, आर्यभट्ट कॉलेज, ट्रिनीटी कॉलेज ऑफ इंजिनियरींग, पुणे यासह देशभरामध्ये १७ केंद्रे निवडली आहेत. या संस्थांना वेगवेगळ्या जबाबदाऱ्या देण्यात आल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com