Kolkata News : आयआयटीच्या आवारात फिरा शेअर सायकलवर; प्रदूषण घटवून हरित वाहतुकीला प्रोत्साहनासाठी उपक्रम

दिवसेंदिवस वाढणारे प्रदूषण कमी करून हरित वाहतुकीला प्रोत्साहन देण्यासाठी खड्‌गपूर येथील भारतीय तंत्रविज्ञान संस्थेने (आयआयटी) सायकलींचा सार्वजनिक वापर करणाऱ्या प्रणालीचे (पीयूबीबीएस) उद्‌घाटन केले आहे.
IIT launches cycle sharing initiative to promote green transportation
IIT launches cycle sharing initiative to promote green transportationSakal

कोलकता : दिवसेंदिवस वाढणारे प्रदूषण कमी करून हरित वाहतुकीला प्रोत्साहन देण्यासाठी खड्‌गपूर येथील भारतीय तंत्रविज्ञान संस्थेने (आयआयटी) सायकलींचा सार्वजनिक वापर करणाऱ्या प्रणालीचे (पीयूबीबीएस) उद्‌घाटन केले आहे.

‘क्लाऊड’ तंत्रज्ञानावर आधारित असलेली ही प्रणाली नाममात्र सदस्यत्व शुल्क भरून वापरता येऊ शकते. त्यामुळे, कोणतीही विशिष्ट उपकरणे किंवा कर्मचाऱ्यांशिवाय सायकलींचा वापर करता येईल, अशी माहिती संस्थेच्या प्रवक्त्याने दिली.

या पर्यावरणपूरक प्रकल्पांसाठी गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाने निधी दिला आहे. गेल्या आठवड्यात आयआयटी खड्‌गपूरच्या आवारात या उपक्रमाची यशस्वी प्रायोगिक चाचणी घेण्यात आली.

यात अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. सायकलींना कुलूप लावण्यासाठी स्मार्ट इलेक्ट्रो-मेकॅनिकल आयओटीचा (इंटरनेट ऑफ थिंग्ज) वापर करण्यात आला आहे. सायकलींसाठी ‘बायसिकल शेअरिंग ॲप’चा वापर करावा लागेल.

ते ‘पीयूबीबीएस’ ऑपरेटरशी जोडलेले असून ॲपमधील जीपीएसमुळे वापरकर्त्यांना सायकलीचे नेमके ठिकाण शोधण्यास मदत होते. त्याचप्रमाणे, सायकलचोरीचा शोध घेणे, ऊर्जा कार्यक्षम असा हार्डवेअर आराखडा आणि रोबोटिक हार्डवेअर ड्रायव्हरसह लॉकिंग व अनलॉकिंगची सुविधाही या ॲपमध्ये उपलब्ध करून दिलेली आहे.

आयआयटी खड्‌गपूरमधील वास्तुकला व प्रादेशिक नियोजन विभागातील प्रा. देवप्रतीम पंडित यांनी या सायकलींचे हे स्वदेशी सॉफ्टवेअर विकसित केले आहे. या सॉफ्टवेअरमध्ये उद्योजकतेला प्रोत्साहन देण्याची क्षमता आहे. त्यामुळे क्लाऊड तंत्रज्ञानावर आधारित सेवांचा वापर करून सायकली भाड्याने देता येऊ शकतात किंवा त्यांचा सार्वजनिक वापर करता येऊ शकतो, असेही त्यांनी सांगितले.

सायकल व ई-बाईक शेअरिंग प्रणालीसाठी व ‘मेक इन इंडिया’ स्मार्ट लॉक असणारी ‘पीयूबीबीएस’ ही पहिली प्रणाली आहे. सध्या आम्ही ब्लूटूथवर आधारित असलेल्या या स्मार्ट लॉकचे पहिल्यांदा उत्पादन केले आहे. आमच्या संस्थेच्या आवारातील अतिथिगृहात पाहुण्यांच्या फायद्यासाठी या प्रणालीचा वापर करण्याचे आमचे नियोजन आहे. सुरुवातीला काही आठवडे सायकलींचा वापर विनामूल्य करता येईल. त्यानंतरसुद्धा त्या नाममात्र शुल्कामध्ये उपलब्ध असतील.

- प्रा. व्ही.के. तिवारी, संचालक, आयआयटी खड्‌गपूर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com