

IIT Madras
sakal
नवी दिल्ली : ‘आयआयटी मद्रास’मधील संशोधकांनी उर्ध्वरेषीय उड्डाण आणि लँडिंग (व्हर्टिकल टेक ऑफ अँड लँडिंग-व्हीटीओएल) करणाऱ्या विमानाची; तसेच मानवरहित हवाई वाहनाची (यूएव्ही) चाचणी केली असून, ‘हायब्रिड रॉकेट थ्रस्टर’च्या साह्याने ही चाचणी करण्यात आली आहे. या महत्त्वपूर्ण संशोधनामुळे भविष्यात भल्या मोठ्या ‘रन-वे’शिवाय दुर्गम भागांतही विमानाचे उड्डाण शक्य होणार आहे.