esakal | रामदेव बाबांवर 'देशद्रोह' लावा; IMA चं PM मोदींना पत्र
sakal

बोलून बातमी शोधा

रामदेव बाबांवर 'देशद्रोह' लावा; IMA चं PM मोदींना पत्र

रामदेव बाबांवर 'देशद्रोह' लावा; IMA चं PM मोदींना पत्र

sakal_logo
By
विनायक होगाडे

नवी दिल्ली : योगगुरु रामदेव बाबा (Ramdev Baba) यांच्या अडचणीत आता आणखी वाढ होण्याची चिन्हे दिसून येत आहेत. त्यांनी ऍलोपॅथीवरुन केलेलं वक्तव्य त्यांना चांगलंच भोवणार असल्याचं दिसून येतंय. इंडियन मेडिकल असोसिएशन (IMA) उत्तराखंडने रामदेवबाबांना एक हजार कोटी रुपयांच्या मानहानीची नोटीस पाठवून पुढील १५ दिवसात लेखी माफी मागण्यासही सांगितले आहे. तसेच असोसिएशनने आज बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींना (PM Modi) एक पत्र लिहलं आहे. या पत्रात IMA ने म्हटलंय की, पतंजलीचे मालक रामदेव यांच्याकडून लसीरकरणासंदर्भात पसरवल्या जाणाऱ्या चुकीच्या माहितीला तातडीने थांबवण्यात यावं. (IMA writes a Letter to PM Modi To Stop Misinformation On Vaccination By Ramdev And Action Should Be Taken Under Sedition Charge)

हेही वाचा: रामदेव बाबा अडचणीत, IMA नं पाठवली 1 हजार कोटींची मानहानीची नोटीस

IMA ने म्हटलंय की एका व्हिडीओमध्ये रामदेव बाबांनी दावा केलाय की लसीचे दोन डोस घेतल्यानंतरही 10 हजारहून अधिक डॉक्टर्स आणि लाखों लोकांचा मृत्यू झाला आहे. IMA ने रामदेव बाबांच्या विरोधात देशद्रोहाच्या आरोपाअंतर्गत कारवाई करण्याची मागणी केली आहे.

याआधी अलॉपॅथी ट्रिटमेंटवरुन रामदेव बाबांच्या वतीने विचारण्यात आलेल्या 25 प्रश्नानंतर IMA उत्तराखंडने त्यांच्याविरोधात कायदेशीर नोटीस जारी केली आहे. IMA ने म्हटलंय की, रामदेव बाबांना अलॉपॅथीमधील 'ए' देखील माहिती नाहीये. आम्ही त्यांच्या प्रश्नांची उत्तरे देण्यास तयार आहोत, मात्र सर्वांत आधी त्यांनी आपली योग्यता सांगावी. जर रामदेव बाबांनी येत्या 15 दिवसांच्या आत माफी मागितली नाही तर त्यांच्या विरोधात एक हजार कोटी रुपयांच्या मानहानीचा खटला दाखल केला जाईल.

हेही वाचा: वाराणसीत कोरोना आटोक्यात आणणारा PM मोदींचा खास माणूस कोण?

रामदेव बाबांनी विचारले होते २५ प्रश्न

दरम्यान, रामदेव बाबांनी सोमवारी ट्विटरवर एक पत्र प्रसिद्ध केले होते. या पत्राद्वारे त्यांनी आयएमएला २५ प्रश्न विचारले होते. त्याआधी सोशल मीडियात व्हायरल झालेल्या व्हिडिओवर आयएमएने तीव्र शब्दांत नाराजी दर्शवली होती. ऍलोपॅथी हे बकवास विज्ञान आहे असे रामदेव बाबा म्हणाले होते.