esakal | वाराणसीत कोरोना आटोक्यात आणणारा PM मोदींचा खास माणूस कोण?
sakal

बोलून बातमी शोधा

NARENDRA MODI

उत्तर प्रदेशात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी ( PM Narendra Modi) यांच्या (Covid situation in Varanasi) वाराणसी मतदारसंघातही संक्रमण वाढत होते

वाराणसीत कोरोना आटोक्यात आणणारा PM मोदींचा खास माणूस कोण?

sakal_logo
By
कार्तिक पुजारी

नवी दिल्ली- उत्तर प्रदेशात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी ( PM Narendra Modi) यांच्या (Covid situation in Varanasi) वाराणसी मतदारसंघातही संक्रमण वाढत होते. अशावेळी कोविड परिस्थिती हाताळण्यासाठी पंतप्रधान कार्यालयाने Prime Minister’s Office (PMO) मागील महिन्यात वाराणसीत थेट हस्तक्षेप केला. पंतप्रधान कार्यालयाने एका विश्वासू व्यक्तीला वाराणसीत पाठवलं. माजी आयएएस अधिकारी आणि भाजपचे विधानपरिषद सदस्य ए. के. शर्मांना वाराणसीत पाठवण्यात आलं. पंतप्रधान कार्यालय आणि वाराणसी यातील दूवा म्हणून त्यांनी काम सुरु केलं. याचे अपेक्षित निकाल जिल्ह्यात पाहायला मिळाले. (How Varanasi cut Covid cases pm Modi man ex IAS officer a k sharma )

मे महिन्याच्या सुरुवातीपर्यंत वाराणसी यूपीतील कोरोनाने प्रभावित पाच जिल्ह्यांपैकी एक होता. 25 एप्रिलला जिल्ह्यात 2,057 कोरोनाबाधित आढळून आले होते, तर 15 जणांचा मृत्यू झाला होता. या महिन्यामध्ये कोरोना रुग्ण संख्येत मोठी घट झाली आहे. सध्या देवभूमीत दिवसाला जवळपास 250 रुग्ण आढळून येत आहेत. उत्तर प्रदेशातील इतर जिल्ह्यांमध्ये कोरोना स्थिती बिघडत असताना आणि हॉस्पिटल बेड्सचा तुटवडा असताना वाराणसीची स्थिती तुलनेने खूप चांगली आहे. शर्मा यांना देवभूमीत पाठवण्याचा निर्णय योग्य ठरल्याचं अनेक अधिकारी आणि स्थानिक आमदाराचं मत आहे. ThePrint ने यासंदर्भातील वृत्त दिलंय.

हेही वाचा: 'मास्टरस्ट्रोक!' मोदींच्या कामगिरीची 420 रहस्यं; 56 पानी कोरं पुस्तक प्रकाशित

ए. के. शर्मा पीएम मोदींच्या जवळचे

शर्मा यांना पंतप्रधान मोदींच्या जवळचे मानले जाते. मोदी मुख्यमंत्री होते, तेव्हापासून शर्मा यांनी त्यांच्यासोबत काम केलंय. ते गुजरात मुख्यमंत्री कार्यालयात सचिव होते. त्यानंतर 2014 मोदींच्या विजयानंतर ते पंतप्रधान कार्यालयात रुजू झाले. विशेष म्हणजे त्यांनी भाजपमध्ये जाण्यासाठी प्रशासकीय सेवेतून निवृत्ती घेतली. त्यानंतर त्यांची उत्तर प्रदेशच्या विधान परिषदेचा सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली.

वाराणसीची यंत्रणा केली सक्रिय

13 एप्रिलला वाराणसीची जबाबदारी घेताच त्यांनी प्रमुख अधिकारी, महापालिका आणि पोलिसांना धारेवर धरलं. त्यांना कामाला लावलं. काही दिवसांच्या कालावधीत त्यांनी 24×7 चालणारे काशी कोविड रिस्पॉन्स सेंटर सुरु केले. ज्यामुळे हॉस्पिटल बेड्स, ऑक्सिजन, रेमडेसिव्हिर किंवा इतर औषधांची उपलब्धता याबाबत रिएल टाईम डेटा मिळण्यास मदत झाली. याशिवाय त्यांनी ब्लॉक ते ग्राम पंचायत स्तरावर योग्य प्रमाणात चाचण्या घेण्यासाठी यंत्रणा तयार केली. ज्यांना लागण झालीये किंवा ज्यांच्यात लक्षणे आहेत अशांना वैद्यकीय कीटची वाटप करण्यात आली. असं म्हटलं जातं, की शर्मा एक समांतर यंत्रणा चालवते होते आणि त्यांचा थेट संपर्क पंतप्रधान कार्यालयासोबत होता. शर्मा यांनीही ट्विट करुन याची पुष्टी केलीये. पंतप्रदान मोदींच्या आशिर्वादाने आणि त्यांच्या मार्गदर्शनाने सर्व चांगलं होत असल्याचं त्यांनी ट्विट करुन म्हटलंय.

हेही वाचा: काश्मीरचं कौतुक; एका जिल्ह्यात सर्व 45+ लोकसंख्येला मिळाली लस

उत्तर प्रदेशातील अनेक जिल्ह्यांमध्ये कोरोना स्थिती बिघडत असताना फक्त वाराणसीकडे विशेष लक्ष देण्यात आल्याने टीकाही होऊ लागली आहे. एखाद्या विधानपरिषद सदस्याला जिल्ह्याची जबाबदारी देणे पहिल्यांदाच घडलं असावं. राज्य सरकारकडून एखादा अधिकारी जिल्ह्याच्या कामावर पाठवल्याची माहिती नाही. एमएलसी सदस्याला अशा प्रकारची शक्ती किंवा अधिकार देणे असामान्य आहे. पण, अशा प्रकारचे आदेश थेट पंतप्रधान कार्यलयातून आले होते. शेवटी तो पंतप्रधान मोदींचा मतदारसंघ आहे, असं एका वरिष्ठ आयएएस अधिकाऱ्याने म्हटलं. पण, शर्मा यांना वाराणसीत पाठवण्याचा योग्य निर्णय होता, असं म्हणालयाही अधिकारी विसरला नाही.