Weather Update : फक्त थंडीच नाही, उद्या पाऊसही येणार; हवामान विभागाचा अंदाज | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Weather Update : फक्त थंडीच नाही तर पाऊसही येणार; हवामान विभागाचा अंदाज

Weather Update : फक्त थंडीच नाही तर पाऊसही येणार; हवामान विभागाचा अंदाज

Weather Latest Update : मागील चार-पाच दिवसांपासून थंडीचा जोर वाढलेला आहे. थंडी तर आहेच पण पावसाचाही अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

देशाची राजधानी दिल्लीसह उत्तर भारत आणि देशाच्या इतर काही भागात कडाक्याची थंडी पडलेली आहे. येणाऱ्या दिवसांमध्ये या थंडीमध्ये वाढ होणार असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

हेही वाचाः सूर्यकुमार...भारतीय क्रिकेट मधला 'लंबी रेस का...'

विशेषतः उद्या देशामध्ये वातावरणात वेगळाच बदल दिसेल. हवानान खात्याच्या माहितीनुासर १४ जानेवारी रोजी उत्तर भारतात दाट धुकं पडेल. तर १५ जानेवारी रोजी थंडीचा लाट येण्याची शक्यता असून उत्तर प्रदेश, पंजाबसह शेजाच्या विभागांमध्ये थोडा पाऊस बरसण्याची शक्यता आहे.

हेही वाचा: Air India Case : 'त्या' दिवशी विमानात महिलेनेच सीटवर केली लघुशंका; आरोपीची...

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पश्चिम हिमालय क्षेत्रात पाऊस आणि बर्फवृष्टी होऊ शकते. मागच्या २४ तासांमध्ये जम्मू-काश्मीर, लडाख, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये मध्यम स्वरुपाचा पाऊस आणि बर्फवृष्टी झाली आहे. तर पंजाब, हरियाणा, चंदीगढ, दिल्ली आणि उत्तर प्रदेशच्या पश्चिम भागात हलक्या स्वरुपाच्या सरी कोसळल्या आहेत.

मध्य प्रदेशाच्या काही भागांमध्ये तापमान दोन-तीन डिग्री सेल्सिअसपर्यंत वाढलं आहे. त्यामुळे जरासा दिलासा मिळतो. बिहार, राजस्थान, उत्तर प्रवेशचा पूर्व भाग आणि हरियाणामध्ये सध्या दाट धुकं आहे.

टॅग्स :IMDweather updates