Rain Red Alert : राज्यातील घाटमाथ्यावर रेड अलर्ट; २४ जिल्ह्यांना पावसाचा इशारा; कमी दाबाच्या पट्ट्यामुळे मुसळधार सरींचा अंदाज

Maharashtra Weather Update : पुणे घाटमाथ्यावर रेड अलर्ट जारी करण्यात आला असून कमी दाबाच्या पट्ट्यामुळे महाराष्ट्रातील २४ जिल्ह्यांत मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. जाणून घ्या IMD चा ताजा हवामान अंदाज.
Pune Rain Red Alert Maharashtra Weather Update

Pune Rain Red Alert Maharashtra Weather Update

esakal

Updated on

Maharashtra Rain Alert : राज्यात मॉन्सून पुन्हा सक्रिय झाला असून, आज (ता. २२) तब्बल २४ जिल्ह्यांमध्ये पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मॉन्सूनला पोषक ठरत असलेल्या कमी दाबाच्या सक्रिय पट्ट्यामुळे कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने पुणे जिल्ह्याच्या घाटमाथ्यास रेड अलर्ट, तर कोकण, नाशिक, सातारा आणि कोल्हापूरच्या घाटमाथ्यासह सात भागांना ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. याशिवाय मुंबईसह काही जिल्ह्यांत जोरदार पावसाचा, तर विदर्भातील ११ जिल्ह्यांत विजांसह वादळी पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com