
When will monsoon start in India 2025 : या वर्षी भारतात मान्सूनचं आगमन वेळेआधीच होणार आहे. येत्या २७ मे रोजी मान्सून केरळात दाखल होण्याची शक्यता असल्याचं भारतीय हवामान विभागाकडून सांगण्यात आलं आहे. त्यामुळे उष्णतेनं हैराण झालेल्या नागरिकांना लवकरच दिलासा मिळणार आहे. तसेच मान्सून वेळेपूर्वी दाखल होणार असल्याने शेतकऱ्यांनीही समाधान व्यक्त केलं आहे.