
नवी दिल्ली : ‘‘महत्त्वाकांक्षी भारत-मध्यपूर्व युरोप आर्थिक कॉरिडॉर (आयएमईसी) प्रकल्प सुरू करण्यात आला आहे. जागतिक आर्थिक सुरक्षेपुढे अनेक आव्हाने असताना अस्थिरता आणि अनिश्चिततेच्या काळात अशा प्रकारच्या उपक्रमांची गरज आहे,’’ असे इटलीचे ‘आयएमईसी’ दूत, फ्रान्सेस्को टालो यांनी म्हटले आहे. इटालियन दूतावासामध्ये ‘पीटीआय’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये ते बोलत होते.