आर्थिक संकटातील श्रीलंकेला भारतानं केलेल्या मदतीचं IMFकडून कौतुक

भारताची आर्थिक संरचनात्मक सुधारणा आणि लवचिक अर्थव्यवस्थेचंही केलं कौतुक
IMF
IMF

नवी दिल्ली : कोविडच्या अनेक लाटांमुळं अवघं जग आर्थिक आव्हानांचा सामना करत असताना इंटरनॅशन मॉनिटरी फंडानं (IMF) भारताच्या आर्थिक प्रयत्नांचं कौतुक केलं आहे. त्याचबरोबर सध्या अभुतपूर्व आर्थिक संकटात असलेल्या श्रीलंकेला भारतानं केलेल्या मदतीचं देखील IMF कडून कौतुक करण्यात आलं आहे. (IMF lauds India structural reforms resilient economy)

आयएमएफचे व्यवस्थापकीय संचालक क्रिस्टालिना जॉर्जिवा आणि केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांची भेट झाली. या भेटीदरम्यान जॉर्जिवा यांनी भारताच्या संरचनात्मक सुधारणा आणि लवचिक अर्थव्यवस्थेचं कौतुक केलं.

IMF
राज ठाकरेंच्या सुरक्षेबाबत गृहमंत्र्यांना पत्र; बैठकीनंतर नांदगावकरांची माहिती

IMFच्या एमडींनी भारतानं श्रीलंकेला केलेल्या आर्थिक मदतीचं विशेषत्वानं कौतुक केलं आहे. सीतारामन यांनी बैठकीदरम्यान आयएमएफला श्रीलंकेला पाठिंबा आणि तात्काळ आर्थिक सहाय्य करण्याचं आवाहन केलं. त्यावर आयएमएफनं सीतारामन यांना मदतीचं आश्वासनं दिलं. या बैठकीत जगभरात आर्थिक संकटांबाबत चर्चा झाली. यावेळी जॉर्जिवा यांनी भारतासोबत मिळून करण्यात येत असलेल्या आयएमएफच्या क्षमता विकसित करण्याच्या कार्यक्रमांचं कौतुक केलं. केंद्रीय मंत्रालयानं आपल्या निवेदनात ही माहिती दिली.

दरम्यान, श्रीलंका सध्या खूपच वाईट आर्थिक संकटाचा सामना करत आहे. यामुळं अन्न आणि इंधनाचा प्रचंड तुटवडा निर्माण झाला आहे. महागाईमध्ये प्रंचड मोठी वाढ झाली आहे, याचा मोठ्या प्रमाणावर जनतेला फटका बसत आहे. ही सर्व परिस्थिती हाताळण्यात श्रीलंकेचं सरकार अपयशी ठरल्यानं मोठ्या प्रमाणावर श्रीलंकन जनतेकडून निषेध आंदोलन सुरु आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com