Education Department : शैक्षणिक वर्ष पूर्ण होईपर्यंत बदली प्रक्रिया नाही; शिक्षण खात्याचा महत्त्वपूर्ण निर्णय

नव्या शैक्षणिक वर्षाला सुरुवात झाल्यानंतर शिक्षण खात्याने जुन व जुलैमध्ये बदली प्रक्रिया राबवली होती.
Belgaum Education Department
Belgaum Education Departmentesakal
Summary

सध्या शिक्षण खात्यातर्फे सहावी ते आठवीसाठी शिक्षकांची भरती प्रक्रिया सुरू केली आहे.

बेळगाव : शिक्षक भरती (Teacher Recruitment) प्रक्रिया सुरू झाल्यामुळे शैक्षणिक वर्ष पूर्ण होईल, तोपर्यंत बदली प्रक्रिया न राबविण्याचा निर्णय शिक्षण खात्याने घेतला आहे. त्यामुळे बदलीच्या प्रतीक्षेत असलेल्या अनेक शिक्षकांना अजून काही महिने प्रतीक्षाच करावी लागणार आहे.

Belgaum Education Department
मुख्यमंत्र्यांच्या 'त्या' वक्तव्याने काँग्रेस पक्षात मोठी खळबळ; सरकार कोसळण्याची शक्यता, उलट-सुलट चर्चांना उधाण

नव्या शैक्षणिक वर्षाला सुरुवात झाल्यानंतर शिक्षण खात्याने जुन व जुलैमध्ये बदली प्रक्रिया राबवली होती. यावेळी अनेक शिक्षकांनी बदली करून घेतल्यामुळे खानापूर, सौंदत्ती व बैलहोंगल तालुक्यातील अनेक शाळांची अडचण झाली होती. त्यामुळे शिक्षक बदली प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर ज्या शाळांत शिक्षकांच्या जागा रिक्त आहेत.

Belgaum Education Department
Primary Teacher : ऐन दिवाळीच्या तोंडावर शिक्षकांचे पगार रखडले; जिल्हा परिषदेकडून निधीची मागणी

त्या ठिकाणी अतिथी शिक्षकांची नेमणूक केली होती. मात्र कायमस्वरूपी शिक्षकांनी बदली करून घेतल्यामुळे अनेक शाळांत एक किंवा दोन शिक्षक कार्यरत आहेत. सध्या शिक्षण खात्यातर्फे सहावी ते आठवीसाठी शिक्षकांची भरती प्रक्रिया सुरू केली आहे. भरतीसाठी पात्र नवीन शिक्षकांना शाळांचे वाटप केले असून काही दिवसांपासून नवीन रुजू होणाऱ्या शिक्षकांना नियुक्तीपत्र देण्यास सुरुवात झाली आहे. नियुक्तीपत्र मिळालेले शिक्षक १५ दिवसात शाळांत दाखल होणार आहेत.

त्यामुळे सहावी ते आठवीच्या वर्गातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान कमी होणार आहे. दुर्गम भागात अतिथी शिक्षक म्हणून काम करण्यास कोणीही पुढे येत नसल्यामुळे शिक्षण खात्याची डोकेदुखी वाढली आहे त्यामुळे दुर्गम भागातील शाळांकडे शिक्षण खात्याने विशेष लक्ष देण्याची गरज आहे.

Belgaum Education Department
आता अवयवदान करणाऱ्या व्यक्तीवर होणार शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; आरोग्य विभाग महत्त्वाचा प्रस्ताव आणण्याच्या तयारीत!

पूर्व प्राथमिक शाळांत जागा रिक्त

बेळगाव शैक्षणिक जिल्ह्यात ५३७ शिक्षकांच्या जागा भरती होणार आहे. मात्र, या सर्व जागा उच्च प्राथमिक शाळांत भरती केल्या जाणार आहेत. त्यामुळे उच्च प्राथमिक शाळांना दिलासा मिळणार असला तरी पूर्व प्राथमिक शाळांत जागा रिक्त आहेत. त्याकडेही लक्ष देऊन शिक्षकांची भरती होणे गरजेचे आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com