Railways Fare Hike : आता रेल्वेचा प्रवासही महागणार! स्लीपर ते एसी कोचच्या तिकीट दरात मोठी वाढ, जाणून घ्या नवे दर...

Railway Sleeper to AC Ticket Prices Increased from December 26 : रेल्वे बोर्डाने एक परिपत्रक जारी केले आहे. त्यात त्यांनी लांब पल्ल्याच्या मेल, एक्सप्रेस गाड्यांच्या तिकीटात ही वाढ करण्यात आल्याचं सांगितलं आहे. त्यामुळे आता रेल्वेचा प्रवासदेखील वाढणार आहे.
Indian Railways Fare Hike

Indian Railways Fare Hike

esakal

Updated on

Indian Railways has announced a ticket fare hike for long-distance Mail and Express trains : देशात महागाईने आधीच कंबरड मोडलं असताना आता रेल्वेचा प्रवासही महागणार आहे. रेल्वेच्या तिकिटात १० ते ५० रुपये वाढ करण्याचा निर्णय रेल्वे विभागाने घेतला आहे. २६ डिसेंबरपासून नवे तिकिटांचे दर लागू होतील, अशी माहितीही रेल्वे विभागांकडू देण्यात आली आहे. लांब पल्ल्याच्या मेल, एक्सप्रेस गाड्यांच्या तिकीटात ही वाढ करण्यात आल्याचं रेल्वेविभागाकडून सांगण्यात आलं आहे. २१५ किंवा त्यापेक्षा जास्त किमी प्रवासासाठी एक पैसा प्रति किलोमीटर दर इतके दर (Railways Fare) वाढवण्यात आले आहेत. या संदर्भात रेल्वे बोर्डाने एक परिपत्रक जारी केले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com