‘शिक्षणाची गुणवत्ता सुधारणे आवश्‍यक’ - मनीष सिसोदिया

पीटीआय
शुक्रवार, 14 फेब्रुवारी 2020

भारताला विकसित देश बनविण्यासाठी सरकारी शाळांमधील शिक्षणाची गुणवत्ता सुधारण्याचे धोरण राबविण्यास राज्य आणि केंद्र सरकारने  कटिबद्ध राहावे, असे आवाहन आम आदमी पक्षाचे वरिष्ठ नेते मनीष सिसोदिया यांनी गुरुवारी केले.

नवी दिल्ली - भारताला विकसित देश बनविण्यासाठी सरकारी शाळांमधील शिक्षणाची गुणवत्ता सुधारण्याचे धोरण राबविण्यास राज्य आणि केंद्र सरकारने  कटिबद्ध राहावे, असे आवाहन आम आदमी पक्षाचे वरिष्ठ नेते मनीष सिसोदिया यांनी गुरुवारी केले. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

काँग्रेसच्या नेतृत्वाखालील राजस्थानमधील सरकारी शाळांचा विकास दिल्लीच्या धर्तीवर करण्यात येत असल्याचा दावा ‘आप’च्या राजस्थानमधील शाखेने ट्विटरवर केला. त्या पार्श्‍वभूमीवर सिसोदिया यांनी वरील आवाहन केले. सरकारी शाळांमध्ये गुणवत्तापूर्वक शिक्षण व सुविधा देण्यासाठी सर्व राज्ये आणि केंद्राने एकत्रितपणे कालबद्ध कार्यक्रम राबविला पाहिजे. तरच भारताची गणना विकसित देशांमध्ये होईल, असे ट्विट सिसोदिया यांनी केले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Improve the quality of education manish sisodia