esakal | श्रीनगर-बारामुल्ला महामार्गावर टळली मोठी दुर्घटना...
sakal

बोलून बातमी शोधा

improvised explosive device destroyed by army near srinagar baramulla highway

श्रीनगर-बारामुल्ला राष्ट्रीय महामार्गावर लष्कराच्या रोड ओपनिंग पार्टीला (आरओपी) एक बॉम्ब (आयईडी) सापडला. पेट्रोल पंपाजवळील पुलाखाली बसविण्यात तो ठेवला होता. लष्कराच्या जवानांनी वेळेत निकामी केल्यामुळे मोठी दुर्घटना टळली आहे.

श्रीनगर-बारामुल्ला महामार्गावर टळली मोठी दुर्घटना...

sakal_logo
By
वृत्तसंस्था

श्रीनगर: श्रीनगर-बारामुल्ला राष्ट्रीय महामार्गावर लष्कराच्या रोड ओपनिंग पार्टीला (आरओपी) एक बॉम्ब (आयईडी) सापडला. पेट्रोल पंपाजवळील पुलाखाली बसविण्यात तो ठेवला होता. लष्कराच्या जवानांनी वेळेत निकामी केल्यामुळे मोठी दुर्घटना टळली आहे.

कोरोनामुळे लाखोंच्या नोटा वॉशिंगमशीनमध्ये धुतल्या अन्...

जम्मू-काश्मीरमध्ये शोध मोहीम राबविली जात आहे. शोध मोहिमेदरम्यान पहाटेच्या सुमारास बॉम्ब आढळून आला. यानंतर श्रीनगर जिल्ह्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. संचारबंदी 4 आणि 5 ऑगस्टपर्यंत सुरू राहणार आहे. संचारबंदीच्या आदेशात म्हटले आहे की, आम्हाला अशी माहिती मिळाली आहे की, 'काही फुटीरवादी आणि पाकिस्तान समर्थित संघटना जिल्ह्यात 5 ऑगस्ट रोजी 'ब्लॅक डे' साजरा करणार आहेत. यामुळे श्रीनगर जिल्ह्यात कर्फ्यू लागू करण्यात आला आहे.' फुटीरतावादी संघटनेचे लोक हिंसक निदर्शने देखील करू शकतात. ज्यामुळे मोठा धोका निर्माण होऊ शकतो, असे प्रशासनाने म्हटले आहे.

दरम्यान, गेल्या वर्षी 5 ऑगस्टला जम्मू-काश्मीरमधील 370 कायदा हटवून राज्याला केंद्र शासित प्रदेश घोषित करण्यात आले होते. बुधवारी (ता. 5) कलम 370 हटवण्याला एक वर्ष पूर्ण होईल. दहशतवादी 5 ऑगस्ट रोजी राज्यात घातपात करू शकतात. यामुळे गुप्तचर विभागाने सुरक्षा यंत्रणेला सतर्कतेचा इशारा दिला आहे.

चॅलेंज! फोटोमध्ये कुत्र्याला शोधून दाखवाच...