कोरोनामुळे लाखोंच्या नोटा वॉशिंगमशीनमध्ये धुतल्या अन्...

वृत्तसंस्था
Monday, 3 August 2020

जगभरात कोरोना व्हायरसने धुमाकूळ घातला असून, अनेकांना जीव गमवावा लागला आहे. कोरोनाची अनेकांनी धास्ती घेतली आहे. एकाने तर लाखो रुपयांच्या नोटा वॉशिंगमशीनमध्ये धुवून घेतल्या आणि वाळविण्यासाठी ओव्हनचा वापर केला.

सेउल (दक्षिण कोरिया): जगभरात कोरोना व्हायरसने धुमाकूळ घातला असून, अनेकांना जीव गमवावा लागला आहे. कोरोनाची अनेकांनी धास्ती घेतली आहे. एकाने तर लाखो रुपयांच्या नोटा वॉशिंगमशीनमध्ये धुवून घेतल्या आणि वाळविण्यासाठी ओव्हनचा वापर केला. यामध्ये काही नोटा जळाल्या आहेत. संबंधित युवकाची जगभर चर्चा सुरू आहे.

Video: भीषण अपघातात ट्रॅक्टरचे झाले दोन तुकडे...

चीनच्या वुहान शहरामधून कोरोना जगभर पसरला. कोरोनाची भीती लहानांपासून वयोवृद्धांपर्यंत सगळ्यांना आहे. कोरोनाचा संसर्ग वेगाने पसरत असल्यामुळे प्रत्येक गोष्ट धुवून आणि सॅनिटाइझ करून घ्या, असे सातत्याने सांगितलं जाते. नाणी आणि नोटा (पैसे) यांची देवाण घेवाण करताना त्यावरही कोरोनाचे विषाणू असू शकतात किंवा लपू शकतात, असे म्हटले जात. यामुळे अनेकण नोटा सॅनिटाइझ करून घेतात. पण एका युवकाने चक्क 14 लाख रुपये वॉशिंगमशीन टाकले आणि धुवून काढले. पण, वॉशिंगमध्ये नोटा टाकल्यानंतर ते भिजले. ओल्या झालेल्या नोटा सुकवण्यासाठी आणि निर्जंतूक करण्यासाठीही त्याने पुढे तर भन्नाट युक्ती वापरली.

चॅलेंज! फोटोमध्ये कुत्र्याला शोधून दाखवाच...

भिजलेले 14 लाख रुपये वाळवण्याठी त्याने ओव्हनची मदत घेतली. नोटा सुकवण्याच्या नादात त्यातल्या काही नोटा जळाल्या. युवकाने निर्जंतुकरणासाठी वापलेली पद्धत पाहून अनेकांनी डोक्याला हात लावला. यानंतर युवकाने बँक ऑफ कोरियाला भेट दिली. बँक ऑफ कोरियाने सांगितले की, खराब झालेल्या आणि फाटलेल्या नोटांची देवाणघेवाण नियमांतून केली जाऊ शकते. त्यानंतर बँक ऑफ कोरियाने त्या व्यक्तीला नियमांनुसार 23 मिलियन डॉलर (19,320 डॉलर)चे नवीन चलन मंजूर केले आहे. दरम्यान, या युवकाची चर्चा जगभर सुरू आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: youth 14 lakh rupees washed in washing machine due to corona virus at south korea

Tags
टॉपिकस