दोन वर्षात 23 गर्लफ्रेंड; हिंदू मुलींना प्रेमाच्या जाळ्यात ओढणारा इम्रान कोण? फोटो आणि व्हिडिओतून धक्कादायक माहिती उघड

Muslim Man Trap Hindu Girls : प्रेमाचं सोंग घेऊन मुलींना फसवणाऱ्या इम्रानला मथुरामधून अटक करण्यात आली आहे. मोबाईलमध्ये २३ मुलींचे अश्लील फोटो आणि व्हिडिओ सापडले
Muslim Man Trap Hindu Girls Mathura Imran case
Muslim Man Trap Hindu Girls Mathura Imran caseesakal
Updated on

Mathura Imran case: प्रेमाचे सोंग घेऊन तरुणींना जाळ्यात ओढणाऱ्या एका धक्कादायक प्रकरणाचा उलगडा झाला आहे. मथुरामधील कोतवाली परिसरात राहणाऱ्या इम्रान या ऑटो रिक्षा चालकाला पोलिसांनी अटक केली असून त्याच्या मोबाईलमध्ये २३ मुलींचे अश्लील फोटो आणि व्हिडिओ सापडले आहेत. विशेष म्हणजे, आरोपीने दोन वर्षांत या मुलींशी जवळीक साधली होती आणि त्याचे पुढील लक्ष्य तब्बल ५० मुलींना प्रेमाच्या जाळ्यात अडकवण्याचे होते.

प्रेमाचे आमिष, ब्लॅकमेलिंग आणि सोशल मीडियावर बदनामी

इम्रान हा मुस्लिम तरुण हिंदू नाव घेऊन मुलींशी जवळीक साधायचा. प्रेमाच्या भूलथापांमध्ये फसवून तो त्यांच्याशी अश्लील व्हिडिओ तयार करायचा आणि नंतर त्यांचा वापर करून ब्लॅकमेल करायचा. याच व्हिडिओ आणि फोटोंचा वापर तो सोशल मीडियावर पोस्ट करत असे, अशा प्रकारे अनेक मुली आणि विवाहित महिला त्याच्या जाळ्यात अडकल्या होत्या.

सोशल मीडियावर भडकाऊ पोस्ट, पोलिसांचा हस्तक्षेप

ईदच्या दिवशी इम्रानने हिंदू समाजाविरोधात भडकाऊ पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल केल्याने खळबळ उडाली. त्याने एका व्हिडिओत हिंदूंना घराबाहेर पडू नका, असा संदेश दिला होता. या प्रकरणाची माहिती हिंदू संघटनांपर्यंत पोहोचताच त्यांनी भरतपूर गेट पोलिस चौकीत जोरदार आक्रोश केला. पोलिसांनी तत्काळ कारवाई करत इम्रानला अटक केली आणि चौकशी सुरू केली.

Muslim Man Trap Hindu Girls Mathura Imran case
Shubhanshu Shukla Update : शुभांशू शुक्ला यांचे अंतराळ मिशन राकेश शर्मा यांच्या मोहिमेपेक्षा वेगळं कसं आहे? चला जाणून घेऊया..

मोबाईलमधील धक्कादायक माहिती

इम्रानच्या मोबाईलची तपासणी करताना पोलिसांना अनेक मुलींचे आणि विवाहित महिलांचे आक्षेपार्ह फोटो आणि व्हिडिओ सापडले. त्याच्या व्हॉट्सअॅप डीपीवर “काही लोकांचे वय इतके नसते जितक्या जुन्या माझ्या गर्लफ्रेंड आहेत” असे लिहिल्याचे आढळले. एका पोस्टमध्ये त्याने “माझ्या २३ गर्लफ्रेंड आहेत आणि फक्त दोन वर्षांत ५० चे टार्गेट आहे” असे म्हटले होते.

सायबर तपासाची व्यापक कारवाई

पोलिसांनी इम्रानचा मोबाईल सायबर मुख्यालयाकडे पाठवला असून, त्याच्या सर्व सोशल मीडिया अकाउंट्सचा मागोवा घेतला जात आहे. फेसबुक, व्हॉट्सअॅप, इंस्टाग्राम अशा विविध प्लॅटफॉर्मवरील त्याचे अकाउंट तपासले जात असून, कोणत्या कोणत्या महिलांशी त्याने संपर्क केला होता, त्याची माहिती मिळवण्याचे काम सुरू आहे. संबंधित कंपन्यांना URL ID मागवण्यासाठी अधिकृत मेल पाठवण्यात आले आहेत.

Muslim Man Trap Hindu Girls Mathura Imran case
AC Rules in India : भारतात एसी वापरावर येणार बंधन? तापमान 20 अंशांखाली सेट करण्याची अट, काय आहे नवा नियम?

पीडित महिलांची ओळख पटवून तक्रारी घेतल्या जाणार

पोलिस आता इम्रानच्या मोबाईलवरून ओळख पटवलेल्या महिलांशी संपर्क साधून त्यांना तक्रार दाखल करण्यास प्रवृत्त करणार आहेत. काही जणींची समुपदेशनाद्वारे मदत केली जाईल. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, पीडित महिलांकडून लेखी तक्रार घेतल्यास आरोपीविरुद्ध मजबूत खटला उभा करता येईल.

“तो पुन्हा बाहेर येऊ नये”

मथुरा शहराचे सीओ भूषण वर्मा यांनी सांगितले की, “आरोपी इम्रानविरोधात इतके मजबूत पुरावे गोळा केले जातील की तो पुन्हा तुरुंगाबाहेर येता कामा नये. त्याने अनेक निष्पाप महिलांचे जीवन उध्वस्त केले आहे. यापुढे असे गुन्हे घडू नयेत यासाठी कठोर कारवाई केली जाईल.”

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com