Shubhanshu Shukla Update : शुभांशू शुक्ला यांचे अंतराळ मिशन राकेश शर्मा यांच्या मोहिमेपेक्षा वेगळं कसं आहे? चला जाणून घेऊया..

Shubhanshu Shukla and Rakesh Sharma Space Mission Difference : शुभांशू शुक्ला हे अंतराळात जाणारे दुसरे भारतीय ठरणार आहेत. त्यांची मोहीम राकेश शर्मा यांच्या मोहिमेपेक्षा अधिक विज्ञानप्रधान आणि आंतरराष्ट्रीय स्वरूपाची आहे.
Shubhanshu Shukla and Rakesh Sharma Space Mission Difference
Shubhanshu Shukla and Rakesh Sharma Space Mission Differenceesakal
Updated on

Shubhanshu Shukla and Rakesh Sharma Space Mission : भारताचा अंतराळ क्षेत्रातील प्रवास आता नव्या टप्प्यावर पोहोचत आहे. शुभांशू शुक्ला हे अंतराळात झेपावणारे दुसरे भारतीय अंतराळवीर ठरणार आहेत. याआधी 1984 मध्ये राकेश शर्मा यांनी ही कामगिरी केली होती. मात्र शुभांशू यांची मोहीम फक्त एक परंपरेचा भाग नसून, ती एक वैज्ञानिक, तांत्रिक आणि जागतिक दृष्टिकोनातून वेगळी आणि अधिक आधुनिक आहे.

शुभांशू शुक्ला यांचे मिशन

शुभांशू शुक्ला यांची मोहीम ११ जून २०२५ रोजी सायंकाळी ५:३० वाजता प्रक्षेपित होणार होते. हवामानाच्या कारणास्तव ही मोहीम पुढे ढकलण्यात आली आहे. त्यांच्या मोहिमेचं नाव आहे Axiom Mission 4 जी अमेरिका स्थित खासगी अंतराळ संस्था Axiom Space आणि NASA यांच्या सहकार्याने राबवली जात आहे.

राकेश शर्मा यांची मोहीम

राकेश शर्मा हे भारताचे पहिले अंतराळवीर होते. त्यांनी सोव्हिएत युनियनच्या Interkosmos कार्यक्रमांतर्गत 1984 मध्ये Soyuz T-11 मधून उड्डाण केले. त्यांनी 8 दिवस सल्युत 7 या सोव्हिएत अंतराळ स्थानकात घालवले आणि सुमारे 43 प्रयोग केले. ही मोहीम मुख्यतः भारत-सोव्हिएत युती आणि राजनैतिक सौहार्द वाढवण्यासाठी होती.

Shubhanshu Shukla and Rakesh Sharma Space Mission Difference
Shubhanshu Shukla : लढाऊ वैमानिक ते अंतराळवीर! कोण आहेत भारताचे हिरो शुभांशु शुक्ला? थरारक प्रवास जाणून थक्क व्हाल..

शुभांशू यांचं मिशन अधिक संशोधनप्रधान

शुभांशू शुक्ला यांचं मिशन 14 दिवसांचं आहे आणि ते आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर (ISS) राहणार आहेत हे भारतासाठी ऐतिहासिक पाऊल आहे. त्यांच्या मिशनमध्ये 60 वैज्ञानिक प्रयोग असतील, जे बायोमेडिकल, मायक्रोग्रॅव्हिटी, पृथ्वी निरीक्षण आणि अ‍ॅडव्हान्स टेक्नोलॉजी क्षेत्रांतील असतील. हे आतापर्यंतच्या कोणत्याही भारतीय मोहिमेपेक्षा अधिक विज्ञानप्रधान मिशन आहे.

खाजगी भागीदारीतून उड्डाण

राकेश शर्मा यांची मोहीम दोन सरकारांमधील कराराचा भाग होती, तर शुभांशू यांची मोहीम खाजगी-सार्वजनिक भागीदारीचे उदाहरण आहे. भारताने या मिशनसाठी 530 कोटी रुपयांचा करार Axiom Space बरोबर केला आहे. या प्रकारच्या भागीदारीतून भारताचं अंतराळ संशोधन खासगी युगात प्रवेश करत आहे.

Shubhanshu Shukla and Rakesh Sharma Space Mission Difference
iPadOS 26 Update : खुशखबर! iPadOS 26 ची झाली एन्ट्री; नवे स्मार्ट फीचर्स, एकदा बघाच

राकेश शर्मा यांनी भारताच्या अंतराळ इतिहासाची पायाभरणी केली होती, तर शुभांशू शुक्ला यांचं मिशन हे ते भविष्य घडवणाऱ्या दिशेने टाकलेलं पाऊल आहे. वैज्ञानिक प्रयोग, आंतरराष्ट्रीय सहकार्य आणि खाजगी संस्थांची साथ हे सर्व मिळून शुभांशू यांची मोहीम भारतासाठी केवळ गौरव नव्हे, तर ज्ञान आणि प्रगतीचा नवा अध्याय ठरेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com