निवडणुकीआधी 'असं' बोलण्याची कोणाचीही हिंमत नाही - CM केजरीवाल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Arvind Kejriwal
निवडणुकीआधी 'असं' बोलण्याची कोणाचीही हिंमत नाही - CM केजरीवाल

निवडणुकीआधी 'असं' बोलण्याची कोणाचीही हिंमत नाही - CM केजरीवाल

sakal_logo
By
सुधीर काकडे

आगामी काळातील निवडणुकांच्या पार्श्वभूमिवर उत्तरेकडील राज्यांमंध्ये राजकीय हालचालींना वेग आला आहे. पंजाब, गोवा, उत्तर प्रदेश, उत्तराखंड या राज्यांमध्ये होणाऱ्या निवडणुकांच्या पार्श्वभूमिवर सर्वच पक्षांनी तयारी सुरू केली आहे. भाजप, काँग्रेस या प्रमुख पक्षासह आता आम आदमी पक्षाने देखील आपल्या कक्षा वाढवायला सुरूवात केली आहे. त्यातच आज उत्तराखंडमध्ये बोलत असताना अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांनी केलेल्या एका विधानाची मोठी चर्चा होतेय.

दिल्लीत आपण केलेल्या कामांवर आपला विश्वास असल्याचे सांगताना मुख्यमंत्री केजरीवाल म्हणाले की, "2020 च्या निवडणुकीत मी दिल्लीत प्रचार करताना लोकांना सांगितलं होते की, आम्ही काम केलं नसेल तर आम्हाला मत देऊ नका." निवडणुकीपूर्वी हे सांगण्याची हिंमत कोणीच करू शकत नाही. आज मी तुम्हाला आवाहन करतोय की, आम्हाला एक संधी द्या, त्यानंतर तुम्ही इतर पक्षांना मतदान करणे बंद कराल असंही ते पुढे म्हणाले.

हेही वाचा: मोदींचं मन मोठं, कायदे बनतील-पुन्हा येतील - साक्षी महाराज

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या सरकारने दिल्लीत केलेल्या कामांची आणि वेगवेळ्या निर्णयांची देशभरात चर्चा असते. दिल्ली विधानसभेच्या २०२० साली झालेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये आम आदमी पक्षाला यश मिळालं.

loading image
go to top