PM Modi Jacket: मोदींनी घातलं चक्क प्लॅस्टिकचं जॅकेट, यामागे खास कारण

हे जॅकेट परिधान करुन मोदींनी थेट संसदेत हजेरी लावली, काय आहे हे जॅकेट? जाणून घ्या...
PM Modi Jacket: मोदींनी घातलं चक्क प्लॅस्टिकचं जॅकेट, यामागे खास कारण
Updated on

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी कायमच आपल्या पेहरावांवरुन चर्चेत असतात. आता ते पुन्हा एकदा एका खास जॅकेटमुळं चर्चेत आले आहेत. या जॅकेटच्या माध्यमातून त्यांनी पर्यावरणाबाबतचा महत्वाचा संदेश दिला आहे. हे जॅकेट परिधान करुन मोदींनी थेट संसदेत हजेरी लावली. काय आहे हे जॅकेट पाहुयात.

मोदींच्या जॅकेटची खासियत म्हणजे प्लास्टिकचा पुनर्वापर करुन तयार केलेलं हे जॅकेट आहे. पर्यावरणाच्या रक्षणासाठी शाश्वस विकास आणि रिसायकल केलेल्या वस्तू वापरण्याचा त्यांनी यातून मोठा संदेश दिला आहे. बुधवारी हे आकाशी निळ्या रंगाचं जॅकेट परिधान करुन मोदी राज्यसभेत दाखल झाले.

PM Modi Jacket: मोदींनी घातलं चक्क प्लॅस्टिकचं जॅकेट, यामागे खास कारण
Satyajeet Tambe: "दुसरे दादा सत्यजीत दादा"; शपथविधीवेळी तांबेंच्या समर्थकांची घोषणाबाजी

दरम्यान, PM मोदींनी यापूर्वी इंडियन ऑईलच्या 'अनबॉटल्ड' मोहिमेंतर्गत सोमवारी बंगळुरुमध्ये सुरु असलेल्या भारत ऊर्जा सप्ताह २०२३ मध्ये प्लास्टिकपासून बनवलेल्या गणवेशाच्या एका स्टॉलचं उद्घाटन केलं होतं. याच्या आयोजनादरम्यान मोदींनी हरीत विकास, ऊर्जा संक्रमण यासाठी भारताच्या प्रयत्नांना भारतीय मुल्यांशी जोडलं होतं. जे भारतीय अर्थव्यवस्था आणि प्रत्येक भारतीयाच्या जीवनशैलीचा भाग असल्याचं म्हटलं होतं.

मोदी या कार्यक्रमात म्हणाले होते की, आपण प्लास्टिकच्या टाकाऊ बाटल्या रिसायकल करुन तयार करण्यात आलेला गणवेश पाहिलात का? फॅशन आणि ब्युटीच्या जगात तर हा गणवेश कुठेही कमी पडत नाही. प्रत्येक वर्षी असा १०० मिलियन बाटल्यांचा पुनर्वापर करण्याचं लक्ष्य भारतानं ठेवलं आहे. मिशन लाईफला हा प्रयोग अधिक मजबूत करेन असंही मोदींनी यावेळी म्हटलं होतं.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.