Satyajeet Tambe: "दुसरे दादा सत्यजीत दादा"; शपथविधीवेळी तांबेंच्या समर्थकांची घोषणाबाजी

विधानपरिषदेच्या निवनिर्वाचित आमदारांचा शपथविधी सोहळा नुकताच पार पडला.
Satyajeet Tambe
Satyajeet Tambe esakal
Updated on

मुंबई : विधानपरिषदेच्या नवनिर्वाचित आमदारांचा शपथविधी सोहळा विधानभवनात नुकताच पार पडला. यावेळी सत्यजीत तांबे यांच्या समर्थकांनी 'दुसरे दादा सत्यजीत दादा' अशी घोषणाबाजी केली. या घोषणाबाजीमुळं विरोधीपक्ष नेते आणि राष्ट्रवादीचे नेते अजित दादाही चर्चेत आले. (Satyajeet Tambe supporters shout slogans during the swearing in ceremony)

Satyajeet Tambe
Marathwada Liberation: मराठवाडा मुक्ती संग्रामाबाबत अजितदादांची महत्वाची मागणी; काय म्हणालेत जाणून घ्या

विधानपरिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुका नुकत्याच पार पडल्या. यामध्ये सत्यजीत तांबे यांच्या बंडखोरीमुळं नाशिकची निवडणूक विशेष गाजली. यामध्ये भाजपचा पाठिंबा असलेले अपक्ष उमेदवार सत्यजीत तांबे यांचा विजय झाला तर महाविकास आघाडीचा पाठिंबा असलेल्या शुभांगी पाटील या अपक्ष उमेदवाराचा पराभव झाला.

Satyajeet Tambe
Agra Fort: आग्र्याच्या ऐतिहासिक किल्ल्यात शिवजयंती साजरी होणार का? हायकोर्टाचे महत्वाचे निर्देश

दरम्यान, पाच जागांसाठी झालेल्या या निवडणुकीत जे उमेदवार विजयी झाले. त्यांचा आमदारकीचा शपथविधी सोहळा आज विधानभवनात पार पडला. या कार्यक्रमाला विरोधीपक्ष नेते अजित पवारही उपस्थित होते. यावेळी विक्रम काळे आणि सत्यजीत तांबे यांच्या समर्थकांनी 'पहिले दादा अजित दादा आणि दुसरे दादा सत्यजीत दादा' अशी घोषणाबाजी केली. तसेच 'एकच मिशन, जुनी पेन्शन' अशी घोषणाबाजीही यावेळी करण्यात आली.

Satyajeet Tambe
RBI monetary policy: रिझर्व्ह बँकेचं पतधोरण जाहीर; आर्थिक वाढ, महागाई, GDP किती राहील जाणून घ्या

यावेळी कार्यक्रमाला उपस्थित काँग्रेसचे वरिष्ठ नेते अशोक चव्हाण यांच्या सत्यजीत तांबे पाया पडले. यानंतर चव्हाण यांनी हस्तांदोलन करत त्यांचं अभिनंदन केलं. काँग्रेसमधून बंडखोरी करत सत्यजीत तांबे अपक्ष म्हणून निवडून आले आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.