
India-China : भूटानच्या पंतप्रधानांचे चीनबाबत मोठं वक्तव्य; भारताची चिंता वाढली
बेल्जियम : डोकलाम स्टँड ऑफमध्ये रस्त्याच्या बांधकामावरून भारत आणि चीनमध्ये मोठा वाद निर्माण झाला आहे. डोकलाममध्ये भारत आणि चिनी सैनिकांमध्ये झालेल्या चकमकीला सहा वर्षे पूर्ण झाल्यानंतर भूटानच्या पंतप्रधानांनी मोठं वक्तव्य केलं आहे.
भूटानचे पंतप्रधान लोटे शेरिंग यांनी म्हटले आहे की उंच्चीच्या पठारावरील वादावर तोडगा काढण्यात बीजिंगचा समान वाटा आहे. भूतानचे पंतप्रधान म्हणाले की, भारत सरकारला असं वाटतं की, चीनने या भागावर बेकायदेशीरपणे कब्जा केला आहे. भूतानच्या पंतप्रधानांच्या या वक्तव्यामुळे भारताची चिंता वाढली आहे.
भूतानचे पंतप्रधान लोटे शेरिंग यांनी बेल्जियन दैनिक 'ला लिब्रे'ला दिलेल्या मुलाखतीत या गोष्टी सांगितल्या. ते म्हणाले, "समस्या सोडवणे एकट्या भूटानवर अवलंबून नाही. आम्ही तीन देश आहोत. कोणताही मोठा किंवा छोटा देश नाही. तिन्ही देश समान आहेत.
प्रादेशिक वादावर तोडगा काढण्यात चीनच्या सहभागाबाबत भूटानच्या पंतप्रधानांचे विधान मोदी सरकारसाठी चिंतेचा विषय आहे. हे पठार संवेदनशील सिलीगुडी कॉरिडॉरच्या जवळ असल्याने डोकलाममध्ये चीनच्या विस्ताराला भारत नेहमीच विरोध करत आला आहे. हा अरुंद भाग भारताच्या ईशान्येकडील राज्यांना देशाच्या इतर भागांपासून वेगळे करतो.
भूटानचे पंतप्रधान म्हणाले, "आम्ही तयार आहोत. इतर दोन्ही देश तयार होताच, आम्ही चर्चा करू शकतो. तसेच "ट्राय-जंक्शनच्या अटीवर वाटाघाटी करण्यास तयार आहोत.
शेरिंग यांचे हे विधान 2019 मध्ये 'द हिंदू'ला दिलेल्या विधानाच्या विरोधात आहे. 2019 मध्ये, शेरिंग म्हणाले होते की तीन देशांमधील सध्याच्या ट्राय-जंक्शन पॉइंटजवळ 'कोणत्याही बाजूने' 'एकतर्फी' काहीही करू नये. अनेक दशकांपासून ते ट्राय-जंक्शन पॉइंट आंतरराष्ट्रीय नकाशांवर दाखवले गेले आहे. हे बटांग ला नावाच्या ठिकाणी आहे. बटांग लाच्या उत्तरेला चीनची चुंबी व्हॅली आहे, तर आग्नेयेला भूतान आणि पश्चिमेला भारताचे सिक्कीम राज्य आहे.