PM Modi: "भारत जगात 'टॉप 3' मध्ये असेल याची गॅरंटी"; तिसऱ्या टर्मचा उल्लेख करत PM मोदींनी फुंकलं लोकसभेचं रणशिंग

दिल्लीत जगातील सर्वात मोठ्या कन्व्हेन्शन सेंटरच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.
PM Modi
PM Modi

नवी दिल्ली : लोकसभा २०२४ च्या सार्वत्रिक निवडणुकांचे वारे आता वाहायला लागले आहेत. काही दिवसांपूर्वी विरोधकांची एकजूट निश्चित झाली. त्यानंतर आता खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीचं लोकसभा निवडणुकीचं रणशिंग फुकलं आहे.

दिल्लीत जगातील सर्वात मोठ्या कन्व्हेन्शन सेंटरच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी त्यांनी आपल्या तिसऱ्या टर्मचा उल्लेख करत भारत जगातील टॉप ३ अर्थव्यवस्थांमध्ये असेल अशी गॅरंटी दिली. (In my third term India will be among top three economies in the world says PM Modi)

"मी देशाला हा देखील विश्वास देतो की तिसऱ्या टर्ममध्ये जगातील पहिल्या तीन अर्थव्यवस्थांमध्ये एक नाव भारताचं असेल. म्हणजेच तिसऱ्या टर्ममध्ये पहिल्या तीन अर्थव्यवस्थेत भारत गर्वानं उभा असेल. थर्ट टर्ममध्ये टॉप तीन अर्थव्यवस्थेत भारत पोहोचलेला असेल आणि ही मोदीची गॅरंटी आहे" अशा प्रकारे सलग तीन वेळेला आपल्या पंतप्रधानपदाच्या तिसऱ्या टर्मचा उल्लेख यावेळी पंतप्रधानांनी केला.

PM Modi
8th Pay Commission: आठवा वेतन आयोग येणार का? सरकारचा अधिवेशनात मोठा खुलासा

जगातील सर्वात मोठं म्युझिअम उभारणार

मी देशवासियांना याचाही विश्वास देऊ इच्छितो की, २०२४ नंतर माझ्या तिसऱ्या टर्ममध्ये देशाची विकास यात्रा आणखी वेगानं वाटचाल करेल, असंही पुढे मोदी म्हणाले. दिल्लीत याच ठिकाणी कर्तव्य पथाजवळ जगातील सर्वात मोठं म्युझिअम उभारणार असल्याची घोषणा देखील यावेळी PM मोदींनी केली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com