

OBC creamy layer rules
ESakal
सर्वोच्च न्यायालयाने ओबीसींसाठीच्या 'क्रिमी लेयर' आरक्षणावर एक महत्त्वपूर्ण टिप्पणी केली. आयएएस अधिकारी असलेल्या पालकांना आरक्षणाचा लाभ का मिळावा, असा प्रश्न न्यायालयाने उपस्थित केला. जर विद्यार्थ्यांच्या पालकांकडे चांगल्या नोकऱ्या असतील आणि ते चांगले उत्पन्न मिळवत असतील, तर त्यांच्या मुलांनी आरक्षणाचा लाभ घेऊ नये. ओबीसींच्या 'क्रिमी लेयर'साठीच्या आरक्षणासंदर्भातील एका याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयाने ही टिप्पणी केली.