esakal | एका महिन्यात देशातील ६०० हून अधिक बालके अनाथ
sakal

बोलून बातमी शोधा

Orphaned

एका महिन्यात देशातील ६०० हून अधिक बालके अनाथ

sakal_logo
By
सकाळ न्यूज नेटवर्क / वृत्तसंस्था

नवी दिल्ली - कोरोनाच्या लाटेत (Corona Waves) फक्त एका महिनाभराच्या काळात देशातील सुमारे किमान ६०० बालकांनी (Children) आपल्या मातापित्यांचे छत्र गमावले आणि ती सर्वार्थाने अनाथ (Orphaned) झाली, ही माहिती केंद्र सरकारनेच (Central Government) दिली आहे. (In one month more than 600 children in the country are orphaned)

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे अनेक जणांनी आपल्या आप्तस्वकीयांना गमावले. यातच कोरोनाने अनाथपण लादलेल्या बालकांची संख्या शेकडोंच्या घरात असल्याचे सरकारनेच मान्य केले आहे.

हेही वाचा: ESakal Survey : मोदी सरकारबद्दल करा तुमची 'मन की बात'

केंद्रीय महिला व बालविकास मंत्री स्मृति इराणी यांनी आज एका ट्विटद्वारे सांगितले, की संक्रमणाच्या या दुसऱ्या लाटेत एक एप्रिलनंतर आपले माता व पिता असे दोघांनाही गमावणाऱ्या मुलांची संख्या ५७७ आहे. देशातील विविध राज्यांकडून आलेल्या माहितीच्या प्राथमिक आधारावर हा आकडा केंद्राने काढला आहे. मृतांच्या आकडेवारीची परिस्थिती पाहता प्रत्यक्षात ही संख्या यापेक्षा जास्त असण्याची शक्यता आहे. दरम्यान, कोरोनाने पोरके झालेल्या या बालकांच्या रक्षणाची आणि शिक्षणाची जबाबदारी घेण्यासाठी भारत सरकार कटिबद्ध आहे, असे इराणी यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. अनाथ झालेल्या या मुलांच्या कल्याणासाठी पैशाची अजिबात कमतरता नसल्याचे त्यांनी म्हटले.