Rakshabandhan In Nepal : रक्षासूत्रात ब्रह्मा-विष्णु-महेश अन् गाईचा स्वर्ग कनेक्शन, असा साजरा होतो नेपाळमध्ये रक्षाबंधन

नेपाळच्या इतिहासात याला विशेष महत्त्व आहे.
Rakshabandhan In Nepal
Rakshabandhan In Nepal esakal

Rakshabandhan In Nepal : या दिवशी जानाई नेपाळी पुरुष 6 सुती धागे बांधतात. नेपाळच्या इतिहासात याला विशेष महत्त्व आहे. हे धागे पवित्रता आणि संरक्षणाचं प्रतिनिधित्व करतात. भारताचा शेजारी देश नेपाळमध्येही रक्षाबंधन साजरी केली जाते, पण येथील विविध समुदायांमध्ये हा सण साजरा करण्याची पद्धतही भन्नाट आहे. नेपाळी ब्राह्मण आणि छेत्री समाजात हा विशेष दिवस जानाई पौर्णिमा म्हणून ओळखला जातो. या दिवशी जानाई नेपाळी पुरुष 6 सुती धागे बांधतात. नेपाळच्या इतिहासात याला विशेष महत्त्व आहे. हे धागे पवित्रता आणि संरक्षणाचं प्रतिनिधित्व करतात.

हे धागे इतके खास का आहेत, यावरून त्यांची नावे येथील धर्म आणि अध्यात्माशी संबंधित आहेत, याचा अंदाज येतो. दुसरीकडे, येथील नेवार समाज हा क्वती पुन्ही म्हणून रक्षाबंधन साजरी करतात आणि तराई भागातील हिंदू हा सण रक्षाबंधन म्हणूनच साजरा करतात. रक्षाबंधनाशी संबंधित प्रथा आणि विधी सर्व समाजात भिन्न आहेत. नेपाळमध्ये रक्षाबंधनाचा सण कसा साजरा केला जातो ते आज जाणून घेऊया.

Rakshabandhan In Nepal
Astro Tips : घरात योग्य दिशेत दिवा लावल्यास उजळेल भाग्य, घरात पैशांच्या भरभराटीसह नांदेल सुखसमृद्धी

रक्षासूत्रातील ब्रह्मा-विष्णू-महेश

रक्षाबंधन म्हणजेच जानाई पौर्णिमेला घातलेला धागा 6 वेगवेगळ्या धाग्यांनी बनवला जातो. तो उजव्या खांद्यापासून कंबरेपर्यंत जाणावं घातल्याप्रमाणे बांधतात. त्याच्या शेवटच्या टोकाला एक गाठ बांधली जाते. देवाला मंत्र अर्पण करताना ती गाठ पुजारी बांधतात.या सर्व 6 धाग्यांचे स्वतःचे महत्त्व आहे. या 3 धाग्यांपैकी ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांचे प्रतीक आहे. इतर तीन धागे ज्ञान, उपासना आणि कृती दर्शवतात.

Rakshabandhan In Nepal
Astro Tips : घरात योग्य दिशेत दिवा लावल्यास उजळेल भाग्य, घरात पैशांच्या भरभराटीसह नांदेल सुखसमृद्धी

जानाई पौर्णिमा का साजरी केली जाते?

रक्षासूत्र कापसाच्या धाग्याने बनवले जाते. हे एक पवित्र बंधन मानले जाते. नेपाळी ब्राह्मणांमध्ये त्यांच्या जीवनाचे महत्त्व म्हणून पाहिले जाते. जेव्हा मूल प्रौढ होते तेव्हा ते परिधान केले जाते. या प्रक्रियेला ब्रतबंध म्हणतात.

Rakshabandhan In Nepal
Makeup Tips : हाय ये नशीली आँखे! काजळ अन् आयलायनर वापरण्याची योग्य पद्धत कोणती?

देव त्या व्यक्तीसोबत धाग्याच्या रूपात राहतो असे मानले जाते. म्हणूनच ते शुद्ध शरीर, आत्मा आणि मन यांच्यासाठी बांधलेले आहे. असे म्हणतात की हा धागा माणसाला वाईट गोष्टींपासून वाचवतो. प्रत्येक जानाई पौर्णिमेला नेपाळी ब्राह्मण आणि छेत्री समाजातील लोक ती बदलून नवीन जानवे घालतात.

Rakshabandhan In Nepal
Photo Vastu Tips : घरात मोठ्या कौतुकाने मुलांचे फोटो लावताय? थांबा, आधी हे नियम वाचा

जानाई पौर्णिमेला जो कोणी ते परिधान करतो त्याला धर्माचे महत्त्व कळते, असा समज आहे. भारतात ही प्रक्रिया जनेयू किंवा यज्ञपीत संस्कार या नावाने ओळखली जाते. जो ब्राह्मण धारण करतो तो मांस किंवा मासे खात नाही. या प्रक्रियेच्या एक दिवस आधी आंशिक उपवास करणे आवश्यक आहे. त्या व्यक्तीने मांस, कांदा, लसूण यापासून अंतर ठेवावे.जानाई पौर्णिमेला, लांगटांग राष्ट्रीय उद्यानात 4,380 मीटर आत बांधलेल्या तलावात मोठ्या संख्येने ब्राह्मण स्नान करतात. ज्याला धार्मिक महत्त्व आहे.

Rakshabandhan In Nepal
Photo Vastu Tips : घरात मोठ्या कौतुकाने मुलांचे फोटो लावताय? थांबा, आधी हे नियम वाचा

क्वाती पुन्ही: गाय स्वर्गाचा मार्ग दाखवते

नेपाळमधील नेवार समुदाय हा क्वाती पुन्ही म्हणून साजरा करतात. जानाईशिवाय हातावर धागा (दोरा) घालण्याची परंपरा आहे. आंघोळ करून पुरुष पहाटे मंदिरात पोहोचतात, तेथे पुजारी त्यांना धागे बांधतात.दुसऱ्या दिवशी हा धागा सोडून गायीला बांधला जातो. असे मानले जाते की मानवी जीवन संपल्यानंतर गाय स्वर्गाचा मार्ग दाखवते. यानिमित्ताने घरोघरी विविध प्रकारचे पदार्थ बनवले जातात.

Rakshabandhan In Nepal
Health Care News: सकाळी दात न घासता पाणी पिणं योग्य की अयोग्य? जाणून घ्या

नेपाळमधील रक्षाबंधनाची परंपरा

रक्षा बंधनाला नेपाळमध्ये रक्षा बंधन म्हणून ओळखले जाते. तराई भागातील हिंदू तो साजरा करतात. या समुदायामध्ये रक्षाबंधन हा सण भारतात जशी परंपरा आहे तसाच साजरा केला जातो. बहिणी भावांना रक्षासूत्र बांधतात. भारताप्रमाणे येथेही बहिणी पूजेचे ताट सजवतात आणि भावाला टिळा लावल्यानंतर उजव्या हातात राखी बांधतात आणि फुलांचा हार घालतात.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com