esakal | ‘जेईई’ मेन्स पेपरफुटी प्रकरणी, कोर्टाच्या देखरेखीखाली चौकशी करा
sakal

बोलून बातमी शोधा

nsul

‘जेईई’ मेन्स पेपरफुटी प्रकरणी, कोर्टाच्या देखरेखीखाली चौकशी करा

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली: जेईई मेन्सच्या पेपरफुटीबद्दल कॉंग्रेसने शिक्षण मंत्रालय, नॅशनल टेस्टिंग एजन्सीवर ठपका ठेवताना या प्रकरणाची सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली चौकशी व्हावी, अशी मागणी केली. दरम्यान, कॉंग्रेस संलग्न ‘एनएसयुआय’ने उद्या (ता.५) देशभरात निदर्शनांचीही घोषणा केली.

हेही वाचा: राजस्थान पंचायत निवडणुकांमध्ये काँग्रेसची हवा; भाजप पिछाडीवर

जेईई मेन्सच्या पेपरफुटीच्या प्रकरणी सीबीआयने नोएडामधील एका कंपनीच्या दोन संचालकांसह सात जणांना अटक केली आहे. यासंदर्भात सीबीआयने पुण्यासह काही शहरांमध्ये छापेही घातले होते. या प्रकरणी कॉंग्रेस प्रवक्ते गौरव वल्लभ, दिल्ली कॉंग्रेसच्या नेत्या अलका लांबा, ‘एनएसयूआय’चे राष्ट्रीय अध्यक्ष नीरज कुंदन यांनी आज पत्रकार परिषद घेऊन सरकारवर टीकास्त्र सोडले.

तसेच अशा प्रकारचा गैरव्यवहार एनटीएच्या अन्य परीक्षांमध्ये होणार नसल्याची खात्री काय, असा खोचक सवालही केला. देशाच्या भविष्याशी निगडित हा मुद्दा असल्याने गैरव्यवहाराची चौकशी सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली होणे आवश्यक आहे, असे गौरव वल्लभ म्हणाले.

हेही वाचा: मुंबईत दिवसभरात कोरोनाचे 416 नव्या रुग्णांची भर; 4 जणांचा मृत्यू

पेपरफुटीवर केंद्र सरकारचे मौन: लांबा

‘पेपर फोडणाऱ्या सरकारने’ देशातील प्रत्येक तरुणाला उत्तर द्यावे, असे आव्हानही गौरव वल्लभ यांनी दिले. अलका लांबा यांनी भाजपचा उल्लेख ‘बीजेपी - बेचते जाओ पार्टी’ असा केला. भाजपशासित हरियाना, मध्यप्रदेश, कर्नाटक आणि आसाममध्ये पेपरफुटीची प्रकरणे घडल्याचा दावा करताना लांबा यांनी केंद्र सरकार यावर मौन पाळून असल्याचाही आरोप केला. तर, एनएसयूआयचे अध्यक्ष नीरज कुंदन यांनी यूपी आणि बिहारमध्ये नोकरभरतीसाठीचे पेपर फोडले जात असल्याचा आरोप केला. तसेच उद्या (ता. ५) एनएसयुआयतर्फे निदर्शनांचीही घोषणा केली.

loading image
go to top