दुर्गापूजेला मान वाढला, UNESCOच्या यादीत समावेश; ममतांनी काढली आभार रॅली | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

CM Mamata Banerjee

दुर्गापूजेला मान वाढला, UNESCOच्या यादीत समावेश; ममतांनी काढली आभार रॅली

कोलकाता : पश्चिम बंगालचा सांस्कृतीक ठेवा असलेल्या दुर्गापूजेचा युनेस्कोनं अमूर्त सांस्कृतीक वारसा प्रतिनिधी यादीत समावेश केला आहे. यासाठी मुख्यंमत्री ममता बॅनर्जी यांनी युनेस्कोचे आभार मानले आहेत. यासाठी त्यांनी कोलकाता इथं मोठी रॅली काढली. (Inclusion of Durga Puja in UNESCO list CM Mamata Banerjee took out thanks giving rally)

या रॅलीमध्ये सुमारे १००० दुर्गापूजा कमिटीच्या प्रतिनिधींनी सहभाग नोंदवला. उत्तर कोलकात्यातील जरासंका भागात ममतांनी ही रॅली काढली जी रेड रोड इथं समाप्त होणार आहे. रॅलीदरम्यान, जनतेशी संवाद साधताना ममता बॅनर्जी म्हणाल्या, मला युनेस्कोचे आभार मानायचे आहेत की त्यांनी पश्चिम बंगालच्या दुर्गापूजेला ICH टॅग दिला. यामुळं आता आजपासून पुढे दुर्गापूजा उत्सव एक महिना अॅडव्हान्समध्ये सुरु होईल. युनेस्कोसाठी आभार रॅलीत सहभागी झालेल्या लोकांचेही मी स्वागत करते तसेच जगभरातून ही रॅली पाहणाऱ्यांचेही आभार मानते, असंही ममता यावेळी म्हणाल्या.

हेही वाचा: वरळीत एकनाथ शिंदेंचे फ्लेक्स, बॉक्स कमान; आदित्य ठाकरेंना चुचकारण्याचा प्रयत्न

दुर्गापूजा ही बंगाली जनतेच्या भावना आहेत. या परंपरेमुळं सर्व गटातील लोक एकत्र येतात. यामध्ये कला आणि आध्यात्म एकत्र येतं. मी युनेस्कोचे आभार मानते की त्यांनी दुर्गा पूजेला अमुर्त सांस्कृतीक वारसा म्हणून घोषीत केलं.

Web Title: Inclusion Of Durga Puja In Unesco List Cm Mamata Banerjee Took Out Thanks Giving Rally

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..