
Poverty Eradication: दारिद्र्य निर्मूलनाच्या प्रयत्नांमध्ये भारताने मोठी झेप घेतली असून, २०११-१२ ते २०२२-२३ या ११ वर्षांच्या काळामध्ये देशाच्या लोकसंख्येमध्ये अत्यंत गरीब नागरिकांची संख्या २७ टक्क्यांवरून ५.३ टक्क्यांपर्यंत खाली आणण्यामध्ये यश आले आहे, अशी माहिती जागतिक बँकेच्या अहवालातून समोर आली आहे. या काळामध्ये २६.९ कोटी नागरिक अत्यंत गरिबीतून बाहेर आले आहेत.