Rahul Gandhi: महाराष्ट्रातील २०२४ च्या विधानसभा निवडणुकांबाबत राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगावर अत्यंत गंभीर आरोप केले आहेत. जवळपास सर्वच वर्तमानपत्रांमध्ये राहुल गांधींनी यासंदर्भात लिहिलेला लेख प्रसिद्ध झाला आहे. राहुल गांधींच्या या लेखाला भारतीय निवडणूक आयोगानं एका निवेदनाद्वारे उत्तर दिलं आहे. पण या उत्तरावरही राहुल गांधींनी आक्षेप घेतला आहे. उत्तर द्यायला टाळाटाळ करु नका, उत्तर देण्याची ही पद्धत नाही, अशा शब्दांत राहुल गांधींनी निवडणूक आयोगाला पुन्हा एकदा टार्गेट केलं आहे.