Gujarat : गुजरातमधील कंपनीवर‘प्राप्तिकर’ ची कारवाई | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

gujarat
गुजरातेतील कंपनीवर‘प्राप्तिकर’ ची कारवाई

गुजरातमधील कंपनीवर‘प्राप्तिकर’ ची कारवाई

गुजरात : गुजरातेतील रसायने उत्पादन करणाऱ्या तसेच रिअल इस्टेटमधील कंपनीवर प्राप्तिकर विभागाने नुकतेच छापे टाकले. यात १०० कोटी रुपयांचे बेहिशोबी उत्पन्न उघड झाले. विभागाने गुजरातेतील वापी, सारिगाम तसेच सिल्ह्वासा, मुंबईत २० हून अधिक ठिकाणी छापे टाकले.यासंदर्भात, केंद्रीय प्रत्यक्ष कर नियंत्रण मंडळाने(सीबीडीटी) जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे,की कागदपत्रे, डायरीतील नोंदी, डिजिटल डेटानुसार कंपनीचे बेहिशोबी उत्पन्न उघड झाले असून मालमत्ता जप्त करण्यात आली आहे.

कंपनीने खरेदीच्या बनावट पावत्या, बोगस जीएसटी क्रेडिटचा फायदा घेण्यासारख्या विविध पद्धती वापरत करपात्र उत्पन्न लपविल्याचे या पुराव्यातून स्पष्ट होते. त्यातून बेहिशोबी रोख रक्कम जमा केली. रोख व्यवहार आणि स्थावर मालमत्तेतील गुंतवणुकीशी संबंधित कागदपत्रे तसेच रोख कर्जही जप्त करण्यात आले. या कारवाईदरम्यान सुमारे अडीच कोटी रुपये रोख आणि एक कोटी रुपये किंमतीचे दागिनेही जप्त केले. त्याचप्रमाणे, कंपनीची १६ बॅंक खाती गोठविण्यात आली आहेत. संबंधित कागदपत्रे, पुराव्याच्या प्राथमिक विश्लेषणानुसार कंपनीचे बेहिशोबी उत्पन्न १०० कोटी रुपयांपेक्षा अधिक असावे, असेही नमूद केले आहे.

loading image
go to top