प्राप्तिकर विभागाच्या छाप्यातून १८४ कोटींची बेनामी मालमत्ता उघड

महाराष्ट्रातील प्रभावशाली कुटुंबाचा समावेश; ७० ठिकाणी शोधमोहीम
 Income tax department
Income tax departmentsakal media

नवी दिल्ली : प्राप्तिकर विभागाने (Income tax department) मुंबईतील दोन रिअल इस्टेट (mumbai real estate) समूहांवर काही दिवसांपूर्वी छापा टाकला होता. यावेळी काही कागदपत्रे जप्त (documents seized) करण्यात आली होती. तसेच, या समूहांशी संबंधित काही व्यक्तींशीही चौकशी करण्यात आली होती. यातून जवळपास १८४ कोटींची बेनामी संपत्ती (evacuee property) समोर आल्याचे आज केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळातर्फे (CBDT) सांगण्यात आले आहे. विशेष म्हणजे यात महाराष्ट्रातील एका प्रभावशाली कुटुंबाचाही सहभाग असल्याचे सांगण्यात आले आहे.

 Income tax department
स्वतःच्या मुलाचे अपहरण करणाऱ्या बापासह पाच जणांना खर्डीत अटक

प्राप्तिकर विभागाने सात ऑक्‍टोबर रोजी या कंपन्यांच्या मुंबईसह पुणे, बारामती, गोवा, जयपूर येथील तब्बल ७० ठिकाणांवर शोधमोहीम राबवली होती. या शोधमोहिमेतून अनेक बेहिशेबी व्यवहार उघड झाल्याचे प्रसिद्धीपत्रक आज सीबीडीटीने जारी केले आहे. मुंबईतील दोन रिअल इस्टेट समूहांच्या १८४ कोटी रुपयांच्या बेहिशेबी उत्पन्नाचे पुरावेही या शोधमोहिमेत हाती लागल्याचे सांगण्यात आले आहे. बेहिशेबी व्यवहार करण्यासाठी या समूहांनी काही बनावट कंपन्यांचे जाळे तयार केले होते.

त्यानंतर बोगस शेअर, कर्ज, बनावट गुंतवणुकीच्या माध्यमातून या कंपन्यांकडे पैसे वळवण्यात आला. यात महाराष्ट्रातील एका प्रभावशाली कुटुंबाचाही सहभाग असल्याचे प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे. शोधमोहिमेदरम्यान प्राप्तिकर विभागाने २.१३ कोटी रुपयांची बेहिशेबी रोकड आणि ४.३२ कोटी रुपयांचे दागिनेही जप्त केले असून प्राप्तिकर विभाग पुढील तपास करत असल्याचे सांगण्यात आले आहे.

साखर कारखान्यांत गुंतवणूक

कंपन्यांनी संशयास्पद पद्धतीने मिळवलेल्या निधीतून अनेक ठिकाणी मालमत्ता खरेदी केल्या. यात मुंबईत मोक्‍याच्या जागी एक कार्यालय, दिल्लीत एक फ्लॅट, गोव्यात रिसॉर्ट व महाराष्ट्रात काही शेतजमिनींची खरेदी आणि साखर कारखान्यांमध्ये गुंतवणूक करण्यात आल्याचे प्रसिद्धी निवेदनात म्हटले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com