मुख्यमंत्र्यांच्या स्वीय सहाय्यकाच्या घरावर प्राप्तीकर विभागाचा छापा

वृत्तसंस्था
रविवार, 7 एप्रिल 2019

- कमलनाथ यांचे स्वीय सहाय्यकाच्या घरावर प्राप्तीकर विभागाचा छापा
- 15 अधिकाऱ्यांनी त्यांच्या घराची घेतली झडती
- प्राप्तीकर विभागाने देशातील तीन राज्यात धाडी टाकून केली कारवाई

भोपाळ: मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांचे स्वीय सहाय्यक (ओएसडी) यांच्या घरावर प्राप्तीकर विभागाने छापा टाकला असून जवळपास 15 अधिकाऱ्यांनी त्यांच्या घराची झडती घेतली. आगामी लोकसभा निवडणुकीचे वातावरण चांगलेच तापले असताना प्राप्तीकर विभागाने देशातील तीन राज्यात ठिकठिकांनी धाडी टाकून मोठी कारवाई केली आहे.

मुख्यमंत्री कमलनाथ यांचे स्वीय सहाय्यक प्रवीण कक्कड यांच्या जयनगरमधील घरावर रात्री तीन वाजण्याच्या सुमारास आयकर विभागाने छापा टाकला. दरम्यान, प्रवीण कक्कड यांच्याकडे बेहिशेबी मालमत्ता असल्याचा संशय आहे. प्रवीण कक्कड यांच्याशिवाय कमलनाथ यांचा भाचा रातुल पुरी, अमीरा ग्रुप आणि मोजेर बेयर यांच्यावर प्राप्तीकर विभागाने छापे टाकले आहेत.

दरम्यान, प्राप्तीकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार दिल्लीच्या आयकर विभागाने तब्बल 50 ठिकाणी छापे टाकले असून रात्री उशीरापासून या कारवाईला सुरवात झाली. यामध्ये मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांचे स्वीय सहाय्यक प्रवीण कक्कर यांच्यासह रातुल पुरी, अमिरा ग्रुप आणि मोसेर बायर यांच्यावर आयकर विभागाने धाड टाकली आहे. मध्य प्रदेशातील इंदूर, भोपाळशिवाय गोवा आणि दिल्लीतील 35 ठिकाणी आयकर विभागाने छापे टाकले आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Income Tax Officers Raid Homes Of Kamal Naths Aides In Delhi And Indore