

10 Crore Cash Found During IT Action In Lucknow
Esakal
अवैध खाण प्रकरणी चौकशीनंतर आमदारासह त्याच्या निकटवर्तींयांच्या निवासस्थानी आणि ठिकाणांवर छापा टाकल्यानं खळबळ उडालीय. उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊत बसपाच्या एकमेव आमदाराच्या निवासस्थानी आयकर विभागानं छापा टाकला. या छाप्यात १० कोटींपेक्षा जास्त रोकड जप्त केली आहे. बुधवारपासून सुरू असलेली छाप्याची कारवाई गुरुवारी थांबली. अजूनही त्यांच्या कार्यालयासह निकटवर्तीयांवर छापा टाकला जात आहे. आमदाराचं नाव उमाशंकर सिंह असं आहे.