तंबाखू उद्योगावर पुण्यात ‘प्राप्तिकर’चे छापे

पीटीआय
Tuesday, 23 February 2021

तंबाखू आणि तंबाखूजन्य उत्पादनांची विक्री आणि पॅकेजिंग करणाऱ्या पुण्यातील एका उद्योग समूहावर प्राप्तिकर खात्याने घातलेल्या छाप्यात ३३५ कोटी रुपयांची बेहिशेबी संपत्ती उघडकीस आली आहे. केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळानेच माहिती दिली आहे.

नवी दिल्ली - तंबाखू आणि तंबाखूजन्य उत्पादनांची विक्री आणि पॅकेजिंग करणाऱ्या पुण्यातील एका उद्योग समूहावर प्राप्तिकर खात्याने घातलेल्या छाप्यात ३३५ कोटी रुपयांची बेहिशेबी संपत्ती उघडकीस आली आहे. केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळानेच माहिती दिली आहे.

प्राप्तिकर विभागाने राज्यात मुंबई, पुणे आणि संगमनेरसह ३४ ठिकाणच्या विविध कार्यालयांवर १७ फेब्रुवारी रोजी शोध मोहीम आणि जप्तीची कारवाई केली. यावेळी एक कोटी रुपयांची बेहिशेबी रोख  रक्कम जप्त करण्यात आली होती. तसेच रिअर इस्टेटशी संबंधित व्यवहारातून ९ कोटी रुपयांचा फायदा मिळविण्यात आला. याची कोणतीही नोंद करण्यात आली नसल्याचे आढळून आले, असे प्राप्तिकर विभागाने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

आतापर्यंत एकूण ३३५ कोटी रुपयांची बेहिशेबी मालमत्ता सापडल्याचे प्राप्तिकर विभागाने म्हटले आहे. तंबाखू व तंबाखूजन्य उत्पादनांच्या विक्रीव्यतरिक्त हा उद्योग समूह एफएमसीजी आणि रिअर इस्टेट उद्योगातही असल्याचे प्राप्तिकर विभागाने म्हटले आहे. हस्तलिखित आणि कॉम्युटर वरील एक्‍सेल शीट्‌स मध्ये असलेल्या हिशेबांमध्ये २४३ कोटी रुपयांची बेहिशेबी रोख तंबाखू विक्री केल्याची माहिती आढळली.

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Income tax raids on tobacco industry in Pune