महिलांच्या अश्लील कपड्यांमुळे लैंगिक शोषणाच्या घटनेत वाढ : सप नेते

वृत्तसंस्था
मंगळवार, 22 मे 2018

''देशात लैंगिक समस्यांच्या वाढत्या घटनांमागे मोबाईल फोन आणि इंटरनेट हे महत्त्वाचे कारण आहे. देशात घडणाऱ्या वाईट प्रवृत्तीच्या घटनांना मोबाईल जबाबदार आहे. देवाने स्त्री व पुरूषाच्या शरीराची ज्याप्रमाणे रचना केली. त्याप्रमाणे महिलांनी अंगप्रदर्शन होणार नाही, असे कपडे वापरावे''.

नवी दिल्ली : ''महिलांच्या अश्लील कपडे वापरण्यामुळे लैंगिक शोषणाच्या घटनांमध्ये वाढ होत आहे'', असे वादग्रस्त वक्तव्य समाजवादी पक्षाचे महासचिव रामशंकर विद्यार्थी यांनी केले. तसेच देशात लैंगिक समस्यांच्या वाढत्या घटनांमागे मोबाईल फोन आणि इंटरनेट हे महत्त्वाचे कारण आहे, असेही रामशंकर विद्यार्थी म्हणाले.

रामशंकर म्हणाले, देशात लैंगिक समस्यांच्या वाढत्या घटनांमागे मोबाईल फोन आणि इंटरनेट हे महत्त्वाचे कारण आहे. देशात घडणाऱ्या वाईट प्रवृत्तीच्या घटनांना मोबाईल जबाबदार आहे. देवाने स्त्री व पुरूषाच्या शरीराची ज्याप्रमाणे रचना केली. त्याप्रमाणे महिलांनी अंगप्रदर्शन होणार नाही, असे कपडे वापरावे. तसेच बलात्काराच्या घटना रोखण्यासाठी आधी अश्लीलता थांबवायला हवी, असे विद्यार्थी म्हणाले. 

दरम्यान, रामशंकर विद्यार्थी यांनी हे वादग्रस्त विधान केल्याने त्यांच्या या विधानामुळे नवा वादंग निर्माण होण्याची शक्यता आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Increase in the incidence of sexual exploitation due to female wearing