चिंता वाढली! केरळमध्ये पुन्हा मास्कसक्ती | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

covid-19

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील करोनास्थितीचा आढाव घेणारी एक बैठक घेतली

चिंता वाढली! केरळमध्ये पुन्हा मास्कसक्ती

देशाच्या विविध भागांत सध्या कोरोनाचे रुग्ण तुलनेते वाढताना दिसत आहेत. त्यामुळे नागरीकांनी खबरदार घेण्याचे आदेश प्रशासनाने दिले आहेत. कोरोनाचा पॉझिटिव्हिटी रेट तुलनेत अधिक असल्याने केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या चिंतेत भर पडली. रुग्णसंख्या वाढीच्या पार्श्वभूमीवर केरळमध्ये मात्र पुन्हा मास्कसक्ती लागू करण्यात आली आहे. मास्कसक्तीचे उल्लंघन करणाऱ्यांवर आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत कारवाई करण्यात येणार असून सार्वजनिक ठिकाणे, सोहळे, कार्यालये येथे मास्क घालणे बंधनकारक करण्यात आले आहे. नागरिकांच्या हितासाठी केरळ सरकारकडून हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती मिळत आहे.

हेही वाचा: मनसेकडून शरयूकाठी होणार शक्तीप्रदर्शन; अयोध्या दौऱ्याची जय्यत तयारी

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील करोनास्थितीचा आढाव घेणारी एक बैठक दूरदृश्य प्रणालीद्वारे आयोजित केली होती. त्या बैठकीला हजेरी लावल्यानंतर गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत पत्रकारांशी संवाद साधला. करोनाच्या नव्या लाटेची शक्यता लक्षात घेता नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी मास्कचा वापर करावा, असे आवाहन राज्य सरकारतर्फे करण्यात येणार असल्याची माहिती सावंतांनी यावेळी दिली. 'सार्वजनिक ठिकाणी मास्कचा वापर बंधनकारक केलेला नाही. मास्क नसलेल्यांवर कारवाई होणार नाही. परंतु, नव्या लाटेची शक्यता लक्षात घेऊन मास्कचा वापर करण्याचे आवाहन करण्यात येणार आहे', असे मुख्यमंत्री म्हणाले आहेत. त्या अनुषगांने केरळात पुन्हा एकदा मास्कसक्ती केली आहे.

हेही वाचा: इंधन दरवाढीवरून ठाकरेंनंतर ममता बॅनर्जींचे मोदींना उत्तर, म्हणाल्या...

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सांगितलेल्या माहितीनुसार, देशात २४ तासांत २ हजार ९२७ नव्या करोना रुग्णांची नोंद झाली असून, रुग्णसंख्या ४ कोटी ३० लाख ६५ हजार ४९६ वर पोहोचली आहे. उपचाराधीन रुग्णांची संख्या वाढून १६ हजार २७९ वर पोहोचली आहे. ३२ रुग्णांचा मृत्यू झाला असून, मृतांची एकूण संख्या ५ लाख २३ हजार ६५४ झाली आहे. उपचाराधीन रुग्णांची संख्या ६४३ने वाढली आहे. देशातील रुग्ण बरे होण्याचा दर ९८.७५ टक्क्यांवर असल्याचे सांगण्यात आले. रुग्ण बाधित होण्याचा दर ०.५८ टक्के तर आठवड्याचा दर ०.५९ टक्के नोंदवण्यात आला आहे.

Web Title: Increasing Corona Cases In India Imposition Of Mask In Kerala

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top