
इंफाळ : सुरक्षा दल दडपशाही करत असल्याचा आरोप करत कुकी समुदायाचे वर्चस्व असलेल्या भागांमध्ये आंदोलकांनी बेमुदत बंदची हाक दिल्याने आज मणिपूरमधील अनेक भागांमधील जनजीवन विस्कळित झाले. कुकी आंदोलक आणि जवानांमध्ये संघर्ष होऊन एका व्यक्तीचा मृत्यू झाला, तर चाळीस जण जखमीही झाले आहेत.