esakal | स्वातंत्र्याच्या 40 वर्षे आधी परदेशात फडकावला होता भारताचा झेंडा
sakal

बोलून बातमी शोधा

bhikhaji kama.jpg

15 ऑगस्ट रोजी भारत इंग्रजांच्या जोखडीतून मुक्त झाला. यावर्षी भारत 74 वा स्वातंत्र्यदिन साजरा करणार आहे

स्वातंत्र्याच्या 40 वर्षे आधी परदेशात फडकावला होता भारताचा झेंडा

sakal_logo
By
सकाळन्यूजनेटवर्क

नवी दिल्ली- 15 ऑगस्ट रोजी भारत इंग्रजांच्या जोखडीतून मुक्त झाला. यावर्षी भारत 74 वा स्वातंत्र्यदिन साजरा करणार आहे. स्वातंत्र्यदिनी भारताचे पंतप्रधान लाल किल्ल्यावर राष्ट्रीय ध्वज फडकवतात. मात्र, देश स्वतंत्र होण्याच्या 40 वर्षांपूर्वी एका भारतीय महिलेने परदेशात भारताचा ध्वज फडकावून इंग्रजांना आव्हान दिले होते.  भीकाजी कामा यांनी 22 ऑगस्ट 1907 रोजी जर्मनीच्या स्टुटगार्ड येथे सातव्या आंतरराष्ट्रीय सोशलिस्ट काँग्रेसच्या सभेत भारताचा ध्वज फडकावला होता. मात्र, त्यावेळचा भारतीय ध्वज आताच्या तिरंग्यापेक्षा फार वेगळा होता. 

इन्फ्लुएन्झापेक्षाही कोरोना घातक ठरेल; १९१८च्या साथीची तुलना

भीकाजी कामा यांनी लंडन ते जर्मनी आणि अमेरिकेपर्यंत भारत भ्रमण करुन भारताच्या स्वातंत्र्यासाठी वातावरण निर्मिती केली. कामा यांच्याद्ववारे पॅरिसमध्ये प्रकाशित होणारा 'वंदे मातरम' पत्र प्रवासी भारतीयांमध्ये लोकप्रिय होते. कामा यांनी जर्मनीमध्ये फडकवलेल्या ध्वजामध्ये देशाच्या विभिन्न धर्मांच्या भावना आणि संस्कृती यांचे दर्शन होते. ध्वजामध्ये इस्लाम, हिंदुत्व आणि बौद्ध धर्माचे प्रतिक म्हणून हिरवा, पिवळा आणि लाल रंगाचा वापर करण्यात आला होता. शिवाय ध्वजावर देवनागरी लिपीमध्ये वंदे मातरम लिहिण्यात आलं होतं.

भीकाजी कामा यांनी आंतरराष्ट्रीय सोशलिस्ट काँग्रेसच्या सभेत भाषण केलं होतं. भारतात ब्रिटश शासन सुरु राहणे मानवतेच्या नावावर कलंक आहे. ब्रिटिशांचे राज्य भारतावर राहणे हिताचे नाही. त्यांनी सभेतील उपस्थितांना भारताच्या मुक्तीसाठी प्रयत्न करण्याचे आवाहन केले. तसेच भारतीयांना आवाहन करताना त्या म्हणाल्या की, पुढे जात रहा, आपण हिंदुस्तानी आहोत आणि हिंदुस्तान हिंदुस्तानी लोकांचा आहे. 

बाटला हाउस चकमकीत शहीद पोलिस निरिक्षक शर्मांना शौर्य पुरस्कार

भीकाजी कामा यांचा जन्म 24 सप्टेंबर 1861 रोजी मुंबई येथे पारसी घरात झाला. त्यांच्यात लोकांची मदत आणि सेवा करण्याची प्रवृत्ती जन्मताच होती. 1896 मध्ये मुंबईत प्लेग पसरल्यानंतर कामा यांनी रुग्णांची सेवा केली होती. रुग्णांची सेवा करताकरता कामा यांनाही या आजाराची बाधा झाली, मात्र उपचार घेल्यानंतर त्या बऱ्या झाल्या. 74 व्या वर्षी 13 ऑगस्ट 1936 मध्ये भारत स्वातंत्र होण्याच्या फार आधी त्यांचे निधन झाले. भारताचा पहिला ध्वज फडकवण्यासाठी भीकाजी कामा यांना देश कायम स्मरणात ठेवील.

(edited by-kartik pujari)