Independence day : स्वातंत्र्यलढ्यातील या घोषणा ठरल्या होत्या प्रेरणादायी

स्वातंत्र्याच्या वेळी लोकांमध्ये चैतन्य जागृत करण्यासाठी लढवय्यांनी अनेक पद्धतींचा अवलंब केला.
Independence day
Independence day google

मुंबई : देशाला स्वतंत्र करण्यासाठी अनेकांनी बलिदान दिले. शहीदांचे स्मरण करून आपण १५ ऑगस्ट हा स्वातंत्र्यदिन साजरा करतो. केवळ लाल किल्लाच नाही तर सरकारी संस्था, शैक्षणिक संस्था आणि अनेक कार्यालये स्वातंत्र्याचा सण साजरा करतात.

स्वातंत्र्याच्या वेळी लोकांमध्ये चैतन्य जागृत करण्यासाठी लढवय्यांनी अनेक पद्धतींचा अवलंब केला. काहींनी आपल्या घोषणांच्या सहाय्याने तर काहींनी आपल्या साहित्यातून लोकांमध्ये देशभक्तीची भावना जागवली आणि लोकांना स्वातंत्र्यासाठी प्रेरित केले. यासाठी स्वातंत्र्यसैनिकांनी काही घोषणा दिल्या होत्या. कोणत्या होत्या त्या घोषणा पाहू या....

Independence day
Har Ghar Tiranga : 'हर घर तिरंगा' मोहीम काय आहे ? यात कसे सहभागी व्हाल ?

१. करा किंवा मरा - ही देशातील सर्वात प्रसिद्ध घोषणा आहे जी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी दिली होती.

२. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच - ही प्रसिद्ध घोषणा लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी दिली होती.

३. तुम्ही मला रक्त द्या, मी तुम्हाला स्वातंत्र्य देतो - नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी देशातील लोकांमध्ये चेतना निर्माण करण्यासाठी ही घोषणा दिली होती.

Independence day
Tiranga : भारताच्या ध्वजातील तीन रंगांचा अर्थ काय ? अशोकचक्र काय दर्शवते ?

४. इन्कलाब जिंदाबाद - हा नारा युवा सेनानी शहीद भगतसिंग यांनी दिला होता.

५. आराम हराम है - ही प्रसिद्ध घोषणा जवाहरलाल नेहरूंनी दिली होती.

६. सरफरोशी की तमन्ना अब हमारे दिल में है, देखना है जोर कितना बाजु-ए-कातिल में है - ही घोषणा राम प्रसाद बिस्मिल यांनी देशवासियांमध्ये देशभक्तीची भावना जागृत करण्यासाठी दिली होती.

७. जय जवान जय किसान - लाल बहादूर शास्त्री यांनी देशातील नागरिकांसाठी ही घोषणा दिली होता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com